
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही अतिशय गुणी, सौंदर्यवान अभिनेत्री आहे. ती तिच्या निरागसतेसाठी आणि फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या क्युटनेसमुळे लाखो चाहत्यांच्या हृदयात वसते. श्रद्धा जिथेही जाते, तिथे तिच्या फॅन्सची जरूर भेट घेते, त्यांच्यासोबत शांतपणे फोटोही काढते.
श्रद्धा नुकतीच एअरपोर्टवर दिसली होती. आणि ते पाहून एका फॅनने तिला चक्क प्रपोझ केलं. श्रद्धाचा हा चाहता तिला भेटण्यासाठी खास फुलांचा बुके घेऊन आला होता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोश मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेक जण त्यावर कमेंट्सही करत आहेत.
पांढरी शॉर्ट पँट आणि फुल स्लीव्हजचा टॉप परिधान करून श्रद्धा कपूर विमानतळावर आली होती. ट्रेंडी स्नीकर्स घालून तिने तिचा लूक पूर्ण केला होता. ते पाहून एका चाहत्याने विमानतळावरच श्रद्धाला प्रपोज केले.
व्हिडीओ झाला व्हायरल
श्रद्धा तिच्या कारमधून खाली उतरताच तिचा चाहता गुलाबाचा बुके घेऊन येतो. आणि एका गुडघ्यावर बसून तो तिला प्रपोझ करतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. श्रद्धाने देखील त्याचा मान राखला आणि त्याच्याशी हस्तांदोलन करून फोटोही काढले. मात्र या व्हिडीओवर युजर्सच्या विविध, गमतीशर कमेंट्सही येत आहेत.
‘ हा कोण मध्येच आला रे ‘ असा सवाल एकाने केला आहे तर ‘ श्रद्धा किती नम्र आणि फिट आहे’ अशा शब्दात दुसऱ्याने तिचं कौतुक केलं.
श्रद्धा कपूरने अलीकडेच तिच्या आगामी चित्रपट स्त्री 2 च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपवलं असून ती घरी परत आली आहे. निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती.