
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा त्याच्या आगामी ड्रीम गर्ल 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. ड्रीम गर्ल 1 या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली होती. आता ड्रीम गर्ल 2 परत एकदा जबरदस्त धमाल करण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) या चित्रपटाची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या ड्रीम गर्ल 2 मध्ये देखील आयुष्मान खुराना हा पूजाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान खुरानाचे चित्रपट धमाका करताना दिसत नाहीयेत.
ड्रीम गर्ल 2 च्या निर्मात्यांना चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. विशेष म्हणजे आयुष्मान खुराना हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 25 आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट काय कामगिरी करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. या ट्रेलरनंतर चाहत्यांमधील उत्साह वाढल्याचे बघायला मिळाले. आता नुकताच चित्रपटातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेले गाणे अर्थात दिल का टेलीफोन 2.0 नुकताच रिलीज करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या गाण्यामध्ये आयुष्मान खुराना याचे अनेक रूप बघायला मिळत आहेत. दिल का टेलीफोन 2.0 हे गाणे प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. इंटरनेटवर हे गाणे धूम घालताना देखील दिसत आहे. ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अनेकांनी ड्रीम गर्ल 2 च्या निर्मात्यांवर देखील टिका केली होती.
ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये अनन्या पांडे हिला संधी दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण ड्रीम गर्ल 1 मध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री नुसरत भरूचा ही होती. विशेष म्हणजे यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त अशी आवडली देखील होती. मात्र, असे असतानाही नुसरत भरूचा हिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
नुसरत भरूचा ही ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार नसल्याचे कळाल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये संतापाची वातावरण ही बघायला मिळत आहे. अनन्या पांडे ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आहे. निर्मात्यांनी सर्वांनाच धक्का देत ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये नुसरत भरूचा ऐवजी थेट अनन्या पांडे हिला साईन केले होते.