Scoop | आयुष्मान खुराना मुंबईत दाखल, लवकरच करणार नवीन चित्रपटाची घोषणा!

आयुष्मान खुराना (Ayushmann Khurana)  लॉकडाउननंतर मुंबईत दाखल झाला आहे.

Scoop | आयुष्मान खुराना मुंबईत दाखल, लवकरच करणार नवीन चित्रपटाची घोषणा!

मुंबई : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurana)  लॉकडाउननंतर मुंबईत दाखल झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आयुष्मान लवकरच एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. तो मुंबईत चित्रपट साइन इन करण्यासाठी आला आहे. आतापर्यंत आयुष्मानचे चित्रपट हिट झाले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची स्टोरी हटके असते. त्यामुळे कमी कालावधीच आयुष्मान खुरानाचा चाहता वर्ग मोठा आहे. आयुष्मानचे चंडीगढ़ करे आशिकी आणि डॉक्टर जी हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. (Ayushmann Khurana arrives in Mumbai after lockdown)

आणि नवीन वर्षात नवीन चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आयुष्मानने यापूर्वीही म्हटले होते की, “मला माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील लोकांचे मनोरंजन करायचे आहे. मी प्रेक्षकांसमोर सर्वोत्कृष्ट अभिनव सादर करू इच्छितो. सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करण्याची माझी वैयक्तिक महत्वाकांक्षा आहे आणि मी ती शोधण्यासाठी व मिळवण्याचा प्रयत्न करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटाचं चित्रीकरण कोरोना काळात सुरू झालं होतं आणि आता हे चित्रीकरण संपलं आहे. या चित्रपटाचं दोन महिन्यांपूर्वी चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. ‘चंदीगड करे आशिकी’च्या चित्रीकरणानंतर वाणी कपूरनं फोटो शेअर केले होते.

‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमनं धमाल पार्टी केली होती. वाणीनं पार्टीचे काही फोटो शेअर केले होते, या फोटोमध्ये वाणी, आयुष्मान आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर केक कापताना दिसत होते. वाणीनं ‘या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं आहे.

संबंधित बातम्या : 

लोकल क्रांतिकारी म्हणत कंगनाने डिवचलं, भडकलेल्या दिलजीतचं जशास तसं प्रत्युत्तर!

Big News | करण जोहरला मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनमध्ये आता गौतम अदाणींची एन्ट्री!

(Ayushmann Khurana arrives in Mumbai after lockdown)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI