आयुष्मान खुराना आणि ताहिरा या दोघांच्या लग्नाचा आज 12 वा वाढदिवस आहे. हे दोघेही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. ते सतत त्यांच्या प्रेमाची झलक दाखवणारे फोटो मीडियावर पोस्ट करत असतात.
1 / 7
आयुष्मान खुरानानं आजच्या स्पेशल दिवशी ताहिरासाठी एक फोटो शेअर करत मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने ताहिरासाठीचं प्रेम व्यक्त केले आहे.
2 / 7
या दोघांच्या लग्नाला जरी 12 वर्ष पूर्ण झाले असले तरी ते एव्हरग्रीन कपलप्रमाणेच वावरत असतात. त्या दोघांचं नातं हे खूप सुंदर आहे.
3 / 7
ताहिरा नेहमीच सोशल मीडियावर आयुष्मानसोबत फोटो शेअर करत असते.
4 / 7
या दोघांच्या लव्ह स्टोरीची नेहमीच चर्चा असते. महत्वाचं म्हणजे हे दोघं अनेकदा त्यांचे जूने फोटो पोस्ट करत असतात.
5 / 7
आयुष्मान आणि ताहिराच्या काही फोटोमध्ये ते दोघे फार सुंदर दिसतात. बऱ्याच फोटोत ते दोघेही परफेक्ट कपल गोल्स देतात.
6 / 7
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयुष्मान आणि ताहिराला अनेक कलाकारांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.