A R Rehaman : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमानच्या कामगिरीने जिंकली चाहत्यांची मने

| Updated on: Sep 17, 2022 | 12:12 PM

मलेशियातील क्वालालंपूर येथील नॅशनल स्टेडियम बुकित जलील येथे होणाऱ्या या कॉन्सर्टला 'एआर रहमान - सीक्रेट ऑफ सक्सेस असे नाव देण्यात आले आहे. युसूफची फर्म डीएमवाय क्रिएशन दर सात वर्षांनी मलेशियामध्ये 'मोझार्ट ऑफ मद्रास' किंवा भव्य कॉन्सर्ट आयोजित करते.

A R Rehaman : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमानच्या कामगिरीने जिंकली चाहत्यांची मने
A R Rehman
Image Credit source: Instagram
Follow us on

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर.रहमान (AR Rahman)आज कुठल्याही प्रसिद्धीचे  मोहताज नाहीत. संगीत विश्वातील त्यांच्या योगदानासाठी, एआर रहमानने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. विक्रम प्रस्थापित केले आहेत. दरम्यान, आता या संगीतकाराने आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. अलीकडेच, मलेशियातील (Malaysia)एआर रहमान कॉन्सर्टमध्ये मलेशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Malaysia Book of Records)प्रवेश केला आहे. तब्बल 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून मैफलीची घोषणा केली आहे. DMY चे प्रॉडक्शन चेअरमन दातो मोहम्मद युसूफ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हेलिकॉप्टरमधून एआर रहमानच्या मलेशियातील मैफिलीची घोषणा केली.

सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर केलं जाहीर

एआर रहमाननेही हा खास क्षण त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला. चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अध्यक्ष व त्यांचे सहकारी ध्वजासह उडी मारतानाची व्हिडिओ क्लिप शेअर केली व्हिडिओ ट्विट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,Malaysia… are you ready? असे कॅप्शन दिले आहे.

हे सुद्धा वाचा

मलेशियातील क्वालालंपूर येथील नॅशनल स्टेडियम बुकित जलील येथे होणाऱ्या या कॉन्सर्टला ‘एआर रहमान – सीक्रेट ऑफ सक्सेस असे नाव देण्यात आले आहे. युसूफची फर्म डीएमवाय क्रिएशन दर सात वर्षांनी मलेशियामध्ये ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ किंवा भव्य कॉन्सर्ट आयोजित करते. येत्यानवीन वर्षात 28 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे.

असाही केला सन्मान

यापूर्वी, गेल्या महिन्यातच आणखी एक यश संपादन केले होते. एआर रहमान यांच्या सन्मानार्थ कॅनडाच्या मारखम शहरातील एका रस्त्याला ए आर रहमान असे नाव देण्यात आले होते. 2013 च्या सुरुवातीला, मारखम (कॅनडा) मधील आणखी एका रस्त्याला संगीतकार ए आर रहमान यांच्या नावावरून ‘अल्लाह-राखा रहमान; सेंट असे देण्यात आले आहे.m