निसा देवगण दिसताच कुत्रा लागला भुंकायला, लोकही हैराण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, काजोल हिने…

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लेक निसा देवगण ही कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर निसा देवगण हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. बऱ्याचदा निसा देवगण ही लोकांच्या निशाण्यावर देखील असते. सध्या निसा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

निसा देवगण दिसताच कुत्रा लागला भुंकायला, लोकही हैराण, तो व्हिडीओ व्हायरल, काजोल हिने...
Nysa Devgan
| Updated on: Jul 21, 2024 | 4:48 PM

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. काजोलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काजोल हिची वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. काजोल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना काजोल दिसते. काजोल हिची लेक निसा देवगण ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग असते. काही दिवसांपूर्वीच निसा हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यामध्ये तिला व्यवस्थित चालता देखील येत नव्हते. दारूच्या नशेत निसा असल्याने लोकांनी तिच्यावर जोरदार टीकाही केली.

निसा देवगण आणि काजोल या नुकताच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. मात्र, यावेळी निसा हिच्यासोबत असे काही घडले की, सर्वजण हैराण झाले. एअरपोर्टच्या बाहेर पडत असताना पापाराझी हे काजोल आणि निसा यांचे फोटो घेताना दिसले. विशेष म्हणजे यावेळी मायलेकी जबरदस्त लूकमध्ये दिसल्या. निसा हिने तोंडाला मास्क लावल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काजोल ही पुढे निघते आणि निसा ही मागून येताना दिसत आहे. मात्र, अचानक निसा हिला पाहून एअरपोर्टवर एक कुत्रे भुंकायला लागले. कुत्र्याचे भुंकणे एकून निसा ही चांगलीच घाबरताना देखील दिसत आहे. कुत्रा भुंकल्यानंतर घाबरून थोडी पळतानाही निसा देवगण ही दिसत आहे. यानंतर लगेचच काजोल हिने देखील मागे वळून पाहिले.

घडलेल्या प्रकारानंतर सर्वचजण हसताना दिसत आहेत, काजोलही हसताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, एअरपोर्टवर इतके लोक असताना कुत्रा नेमका निसा देवगण हिलाच का भुंकला असावा बंर.

निसा देवगण हिने अजून बॉलिवूड चित्रपटांमध्ये पर्दापण केले नाहीये. मात्र, असे असताना देखील निसा देवगण ही कायमच चर्चेत असते. निसा देवगणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बऱ्यावेळा निसा देवगण ही बॉलिवूडच्या पार्ट्यांनाही हजर असते. निसा देवगण ही बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार की नाही यावर अजय देवगण किंवा काजोल यांनी कधीच काही भाष्य हे केले नाहीये.