Suchitra Bandekar : डॉक्टरांना आदेशचे हार्ट पल्सच सापडत नव्हते; तो अचानक थंड पडला, सुचित्रा बांदेकर यांनी सांगितला प्रसंग

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या अभिनेत्री आणि लोकप्रिय निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गप्पा मारल्या. या गप्पा मारत असताना त्यांनी काही कठीण प्रसंगही सांगितले. त्यांनी बांदेकर कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकवला होता, असा तो प्रसंगही सांगितला.

Suchitra Bandekar : डॉक्टरांना आदेशचे हार्ट पल्सच सापडत नव्हते; तो अचानक थंड पडला, सुचित्रा बांदेकर यांनी सांगितला प्रसंग
aadesh bandekr
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 04, 2026 | 8:47 PM

‘वहिनी उघडं बरं दार’ या वाक्याने सपूर्ण महाराष्ट्रातील वहिनींच्या मनावर राज्य करणारे आदेश भावोजी नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या होम मिनिस्टरला महाराष्ट्रतील सगळ्या वहिन्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण काही वर्षांपूर्वी हेच हसत खेळत राहणाऱ्या भावोजींनी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता.कारण होतं ते दुधी भोपळ्याचं सरबत. त्यानंतर त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती. की त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. त्या दिवशी नेमंक काय घडलं होतं हे आदेश बांदेकरांच्या पत्नी अभिनेत्री सूचित्रा बांदेकर यांनी खुलासा केला आहे.

तो आदेशसाठी नव्हे तर सूचित्रासाठी….

सूचित्रा यांनी सांगितलं की तो दिवस आयुष्यातील सर्वात कठीण दिवसांपैकी एक होता. मी देवपूजा करत होते. नंतर मला नांदा सौख्य भरे मालिकेच्या मीटिंगसाठी लोअर परेलला जायचं होतं. आमच्या घरी काम करणारी मुलगी होती, तिने विचारलं कोणता ज्यूस पिणार, तिला म्हटलं तुला हवा तो बनव. तर तिने दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवला तो ज्यूसचा मोठा ग्लास तिने टेबलावर ठेवला. पूजा झाली त्यानंतर मला उशीर होईल म्हणून तो ज्यूस मी न पिताच निघाले.

Loading...

यानंतर आदेश खोलीतून आवरून आला आणि तो ज्यूस त्याने प्यायला. तो ज्यूस इतका कडू होता, तो तिला म्हटला देखील, अगं ताई हा ज्यूस किती कडू आहे….तरीही तो ते संपूर्ण ग्लास ज्यूस प्यायला. काही वेळाने त्याला जुलाब, उलट्या होऊ लागल्या, त्याची तब्बेत एका क्षणात पार बिघडली. असं सूचित्रा यांनी सांगितलं.

आदेश बांदेकर त्या दिवशी शूटिंगला जाणार होता. त्याला कसंतरीच होतंय हे जाणूव लागलं.आदेश थंड पडू लागला. त्यामुळे त्याने मेकपसाठी माणसं घरीच बोलावली होती. ती माणसं घरी आली होती. त्यानंतर फॅमिली डॉक्टरांना घरी बोलावलं. डॉक्टरांना आदेश बांदेकरांचे पल्सच सापडले नव्हते. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना जवळच्या हिरानंदानी रूग्णालयात तातडीने हलवण्यात आलं.

सूचित्रा मीटिंगसाठी गेल्या होत्या. घरातून फोन आल्यावर त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं. घरात असलेल्या मदतनीस मुलीनं आणि सुचित्रा यांच्या आईनं त्यांना तातडीने हालचाल करत आदेश यांना जवळच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील तो प्रसंग आठवून सुचित्रा म्हणाल्या, “तिथं पोहोचल्यावर माझी अवस्था खराब झाली होती. आदेशची प्रकृती इतकी खालावली होती की डॉक्टरांनी त्यांची ‘हार्ट लाईन’ ओपन केली होती आणि मला कागदपत्रांवर सही करायची होती. त्या वेळी डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की, जर अजून एक उलटी झाली तर… परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सही करताना माझा हात थरथरत होता. मी स्वामी समर्थांकडं कधीच काही मागत नाही, पण त्या दिवशी मी मनातल्या मनात फक्त त्यांचंच नाव घेत होते, एकच गोष्टी मी ही त्यांच्याकडे मागितली…असा हा कठीण प्रसंग सांगताना सुचित्रा भावुक झाल्या होत्या.

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या अभिनेत्री आणि लोकप्रिय निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गप्पा मारल्या. या गप्पा मारत असताना त्यांनी काही कठीण प्रसंगही सांगितले. त्यांनी बांदेकर कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकवला होता, असा तो प्रसंगही सांगितला. ‘सोनचाफा प्रॉडक्शन’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us