CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, तर आमिर खानची लेक म्हणते, ‘मला फरक पडत नाही कारण…’

CJP Protest : 20 जुलै पासून विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत, अनेक सेलिब्रिटींनी त्याचं समर्थन देखील केलं, पण आमिर खानची लेक व्हिडीओ पोस्ट करत स्पष्ट म्हणते, 'मला काहीच फरक नाही पडत, कारण...'

CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, तर आमिर खानची लेक म्हणते, मला फरक पडत नाही कारण...
आयरा खान
| Updated on: Jul 25, 2026 | 8:28 AM

CJP Protest : दिल्ली येथील जंतरमंतर येथे गेल्या 34 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. 24 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी आंदोलन देखील पुकारलं. तेव्हा अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थ देखील केलं. इतक्या दिवसांनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर व्यक्त झाल्यामुळे अनेकांनी सेलिब्रिटींना देखील ट्रोल केलं. आता अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने देखील यावर स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. ‘मी न्यूज आणि सोशल मीडिय पाहत नाही. त्यामुळे मला काहीच वाटत नाही…’, असं म्हणत आयरा हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आयरा खान म्हणते, ‘हे सत्य आहे की, मी मानसिक आरोग्यावर अधिक बोलत असते. पण जेव्हा मी अशा मुद्द्यांवर बोलते, तेव्हा मला तुमचं अटेंशन हवं असतं. मला असं लाटतं की मेंटल हेल्थच माझं संपुर्ण जीवन आहे. अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे मी अशा मुद्द्यांवर बोलत नाही.  ती कारणं मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत.’

 

 

‘सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बाहेर जे काही सुरु आहे, त्यासोबत स्वतःला जोडण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. विशेषतः मला त्याबद्दल कोणत्या फिलिंग्स नाहीत आणि असं मी प्रत्येक बातमीसोबत करत असते… मी न्यूज पाहत नाही. मी कोणत्याच हिंसेचे फोटो व्हिडीओ पाहिलेले नाहीत आणि आंदोलनाचे देखील फोटो, व्हिडीओ मी पाहिलेले नाहीत…’, असं देखील आयरा म्हणाली.

पुढे आयरा म्हणाली, ‘मला कोणीतरी एक रिल्स पाठलेली आणि सांगितलेलं, आंदोलनात माझी एक बहीण देखील गेली आहे आणि तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तेव्हा मी प्रचंड घाबरली. पण जेव्हा मला कळलं की, ती ठिक आहे, मी पुन्हा माझ्या कामाला लागले. कारण मला नाही वाटत की, माझ्या बोलण्याने काही फरक पडेल… त्यामुळे मी माफी मागते, कारण माझा असा कोणताच हेतू नव्हता…’ असं देखील आयरा खान म्हणाली…

आयराच्या या व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे, तर अनेकांनी तिचं समर्थन देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त आयरा खान हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us