Ira Khan | चार दिवस राहिले उपाशी पोटी, कित्येक तास ढसाढसा रडले, आमिर खान याच्या लेकीचा धक्कादायक खुलासा

आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर त्याने मोठा निर्णय घेत. काही दिवस कुटुंबियांसोबत वेळ घालवणार असल्याचे स्पष्ट केले. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा निराश झाल्याचे बघायला मिळाले. त्याला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

Ira Khan | चार दिवस राहिले उपाशी पोटी, कित्येक तास ढसाढसा रडले, आमिर खान याच्या लेकीचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Jul 08, 2023 | 6:57 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याने चित्रपटांपासून मोठा ब्रेक घेतलाय. लाल सिंह चढ्डा या चित्रपटाकडून आमिर खान याला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रेक्षकांनी लाल सिंह चढ्डा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याने त्याला मोठा धक्का बसला, लाल सिंह चढ्डा चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर या चित्रपटाचा जोरदार विरोध करताना दिसले होते. याचाच फटका प्रत्यक्षात चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर बसल्याचे बघायला मिळाले. मुळात म्हणजे आमिर खान याला लाल सिंह चढ्डा या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. शेवटी हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्याने आमिर निराश झाला.

लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आमिर खान याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, सतत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने गेल्या काही वर्षांपासून अजिबातच कुटुंबियांना वेळ देऊ शकत नाहीये. यामुळे आता मी ब्रेक घेण्याचे ठरवले आहे आणि कुटुंबियांना वेळ देणार आहे. सध्या कोणत्याच चित्रपटाचे शूटिंग आमिर करत नाहीये.

आमिर खान याची लेक इरा खान ही बाॅलिवूड चित्रपटांपासून तशी दूर आहे. मात्र, इरा खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. इरा खान ही अनेकदा मोठे खुलासे करताना दिसते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इरा खान हिने धक्कादायक खुलासे केले आहेत. इरा खान हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

इरा खान म्हणाली की, डिप्रेशनमध्ये असताना मी अनेक तास काहीही कारण नसताना रडत बसलाचे. इतकेच नाही तर इरा खान पुढे म्हणाली की, न काही खाता मी चार ते पाच दिवस राहत असतं. काही योग्य निर्णय न घेतल्याने आपण डिप्रेशनचे शिकार झाल्याचे देखील इरा खान म्हणाली आहे.

इतकेच नाही तर आता आपण ठिक असल्याचे देखील इरा खान हिने म्हटले आहे. मात्र, डिप्रेशनच्या काळामध्ये आपल्यासोबत नेमके काय होत होते हे सांगताना इरा खान ही दिसली. इरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरे याच्यासोबत मुंबईत साखरपुडा झाला आहे. इरा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.