आमिर खानच्या या चित्रपटाने भिकाऱ्याच्या आयुष्याला कलाटणी, आता स्वत:चं दुकान, फेसबूक अकाऊंट आणि गर्लफ्रेंडही सोबत..

आमिर खानच्या 'पीके' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली. बंपर कमाई करण्यासोबतच या चित्रपटानेएका व्यक्तीचे आयुष्यही बदलून टाकले. या व्यक्तीने त्या पिक्चरमध्ये भिकाऱ्याची भूमिका साकारली होती. पण त्या भूमिकेने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नेमकं काय झालं, चला जाणून घेऊ ?

आमिर खानच्या या चित्रपटाने भिकाऱ्याच्या आयुष्याला कलाटणी, आता स्वत:चं दुकान, फेसबूक अकाऊंट आणि  गर्लफ्रेंडही सोबत..
| Updated on: Apr 11, 2024 | 11:36 AM

चित्रपटसृष्टीने अनेकांचं आयुष्य बदललं. अनेक लोकांना जमीनीवरून उंचावर नेऊन ठेवलं, त्यांच्या आयुष्यला ३६० अंशांची कलाटणी मिळाली. या यादीत साऊथचे सुपरस्टार रजनीकांत ते बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण रजनीकांत एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करत होते. तर झोपडपट्टीत बालपण घालवणाऱ्या जॅकी श्रॉफचे नाव आज बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट पाहिला असेल तर, त्यातील एका सीनमध्ये पुलावर उभा असलेला भिकारी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. भिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे मनोज रॉय. चित्रपटात मनोजची भूमिका जरी ३० सेकंदांची असली तरी या भूमिकेने त्याचे आयुष्यच संपूर्ण बदलून टाकले.

अशी मिळाली कलाटणी

मनोज रॉयची कहाणी खूप रंजक आहे. ‘पीके’मधील अवघ्या काही सेकंदांच्या भूमिकेने त्याचं आयुष्य बदललं. रंकाचा राव झाला तो खरंच. असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मनोज प्रत्यक्षात भिकारी होता हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा ते दिल्लीच्या जंतरमंतरवर भीक मागून उदरनिर्वाह करत असत. एका मुलाखतीत मनोजने सांगितले होते की, एकदा दोन लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी विचारले की, तुम्ही अभिनय करू शकता का ?त्याचं उत्तर ऐकून त्या दोन लोकांनाही आश्चर्य वाटलं. त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मनोजने सांगितले की, तो येथे अंध व्यक्तीचा अभिय करूनच आपला उदरनिर्वाह करत आहे.

‘पीके’मध्ये मिळाली भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचे वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. मात्र मनोजच्या आयुष्यात एक वेळ आली की दिवसातून दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. त्यानंतर मनोज कामाच्या शोधात दिल्लीला आले, पण इथेही त्यांना काम मिळाले नाही. अखेर त्याला अंध असल्याचे भासवून भीक मागण्यास भाग पडले. मनोज जेव्हा चित्रपटासंबंधी त्या दोन व्यक्तींना भेटला तेव्हा त्यांनी 20 रुपये आणि फोन नंबर दिला.

रिपोर्टसनुसार, मनोज यांना ऑडिशनसाठी नेहरू स्टेडियममध्ये बोलावण्यात आले होते, जिथे त्यांच्यासोबत इतर 7 भिकारी होते. चित्रपटात निवड होत नाही तोपर्यंत त्याच्या मनात एकच विचार होता की दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न तरी मिटावा. पण, मनोज यांच्या नशिबात यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काही लिहिले होते. ‘पीके’ने ते रातोरात प्रसिद्ध झाले. आज त्यांचे एक दुकान आहे, फेसबुक अकाऊंच आणि त्यांना एक गर्लफ्रेंडही आहे. एका मुलाखतीत मनोज यांनी स्वतः सांगितले की, या चित्रपटानंतर ते पुन्हा त्याच्या गावी गेला आणि तिथे त्यांनी स्वतःचे दुकान घेतले. यासोबतच आता त्याचे फेसबुक अकाउंट असून एक सुंदर गर्लफ्रेंड असल्याचेही त्यांनी नमूद केले.