
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ही जोडी एकत्र दिल्यानंतर मात्र त्यांच्याबद्दलच्या घटस्फोटाच्या अफवा या कमी झाल्या. दरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या ही जोडी पार्टनर म्हणून एकमेकांना साथ तर देतेच पण एक पालक म्हणूनही नेहमी आपली जबाबदारी पार पाडताना दिसतात.
अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांची लेक आराध्यासाठी सर्व काही करताना दिसतात. मुख्यत: आराध्या ऐश्वर्यासोबतच दिसून येते. ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत कायमच विदेशात जाताना दिसते. अनेकदा प्रश्न विचारला जातो की, आराध्या शाळेत जाते की नाही? पण अभिषेकही लेकीच्या आनंदासाठी बऱ्याचदा गोष्टी करताना दिसतो. आताही लेकीबद्दलच केलेल्या एका वक्तव्यामुळे अभिषेक बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटाबद्दल बोललं जात आहे. आपल्या चित्रपटाचं सर्वत्र प्रमोशन करताना अभिषेक दिसतोय.
मुलगी आराध्याबद्दल काय म्हणाला अभिषेक
या चित्रपटाच्या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तो नुकताच मुलगी आराध्याबद्दल बोलताना दिसला. अभिषेक म्हणाला की, “जर तुम्ही एखादी भूमिका चित्रपटात करत असाल तर ती भूमिका तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या व्यक्तीशी जोडाल तर अधिक सोप्पे जातं”. अभिषेक पुढे म्हणाला, “आराध्याने न कळतपणे मला चित्रपटात चांगला अभिनय करण्यासाठी मदत केलीये”, तसेच तो पुढे म्हणाला की, सध्या तो असे चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे वडील आणि मुलीचे नाते दाखवले जाईल.
अभिषेक ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात एका मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत
अभिषेक ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात एका मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिषेक याने पहिल्यांदाच लेक आराध्याबद्दल मनमोकळेपणाने बोलला आहे. ‘बी हॅप्पी’ चित्रपटात इनायत वर्मा आणि नोरा फतेही देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे कायमच आराध्या बच्चनची काळजी घेताना दिसतात तिच्या शाळेतील कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. तसेच तिच्याबाबतीत कोणत्याही अफवा पसरू नये याचीही ही दोघं पालक म्हणून नेहमी काळजी घेताना दिसतात. नुकतेच अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या एका व्हॅकेशनवरून आले.
तेव्हा विमानतळावरचा त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये असणारे वाद किंवा त्यांच्यातील तणाव याबद्दल नेमकं काय सत्य आहे हे सांगणं कठीण असलं तरीही ते पालक म्हणून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट आणि एकत्रितपणे पार पाडताना दिसतात. त्याबद्दल नेटकऱ्यांनीही त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे.