ऐश्वर्या, जया बच्चन नाही तर ‘ही’ आहे अभिषेकच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री; नाव जाणून सर्वांनी केलं कौतुक

'कालीधर लापता' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिषेक बच्चनने त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री कोण आहे याचा खुलासा केला आहे. ती स्त्री ऐश्वर्या किंवा जया बच्चन नाही.  त्या स्त्रीचे नाव जाणून सर्वांनाच त्याचे कौतुक वाटले. 

ऐश्वर्या, जया बच्चन नाही तर ही आहे अभिषेकच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री; नाव जाणून सर्वांनी केलं कौतुक
Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2025 | 1:43 PM

बॉलिवूडमध्ये अनेक आगामी चित्रपटांची चर्चा होत आहे. त्यातील एक म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘कालीधर लापता’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हा सिनेमा 4 जुलैला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. अभिषेक बच्चन हा ‘कालीधर लापता’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कुठलीही कसर सोडत नाहीये. त्याच्याकडून आणि चित्रपटाच्या टीमकडून जोरदार प्रमोशनही सुरु आहे.

अभिषेकच्या आयुष्यातील ‘सर्वात सुंदर स्त्री’ कोण?
अभिषेक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध माध्यमांवर मुलाखती देखील देत आहे. अशाच एका खास मुलाखतीमध्ये त्याला एक प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर सध्या चर्चेक आहे. अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील ‘सर्वात सुंदर स्त्री’ कोण? याचा खुलासा केला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर नक्कीच ऐश्वर्या किंवा जया बच्चन असंच डोक्यात येतं. पण तसं नाहीये. त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री ही त्याची पत्नी ऐश्वर्या किंवा आई जया बच्चन किंवा त्याची बहिण नाही.

ऐश्वर्या , जया बच्चन नाही तर ही व्यक्ती आयुष्यात फार जवळची

अभिषेकनं खुलासा केला की त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री म्हणजे त्याची मुलगी आराध्या. अभिषेक त्याच्या मुलीच्या फार जवळ आहे. त्याचा तिच्यावर फार जीव आहे. त्याच्या मते एक संवेदनशील वडील, एक समंजस कलाकार आणि एक प्रेमळ व्यक्ती म्हणून त्याचं वेगळं आणि भावनिक व्यक्तिमत्त्व बनलं आहे ते केवळ आराध्यामुळं.

त्या सुंदर स्त्रीचे मानले आभार  

पुढे तो म्हणाला,”मला वाटत नाही की मी अशा भूमिकांसाठी सक्रियपणे प्रयत्न करत होतो. पण मला यात एक समान धागा दिसला आहे. त्यानंतर मला असे चित्रपट करण्यासाठी जास्तच रस वाटू लगाला. त्यामुळे मी जगातील सर्वात सुंदर स्त्री, माझ्या मुलीचा ऋणी आहे. कलाकार आयुष्यात अनेक टप्प्यांतून जातात आणि जेव्हा मी ‘ब्रीद’, नंतर ‘लुडो’, ‘बॉब’, ‘बी हॅपी’, ‘आय वॉना टॉक’, ‘कालिधर लापता’ या चित्रपटांपासून सुरुवात केली, तेव्हा मला त्याच्यातील पितृत्वाची भावना समजली. कारण मी माझ्या वास्तविक जीवनातही ते अनुभवत होतो आणि अनुभवत होतो. जर आराध्या नसती तर मी अजूनही त्या भावना अनुभवू शकलो असतो का? किंवा त्याच तीव्रतेने त्या मांडू शकलो असतो की? हे माहिती नाही. पण, ते पात्र माझ्याशी बोलायचे कारण मी तिच्यासोबत ते अनुभवलं होतं”.
असं म्हणत त्याने मनातील भावना व्यक्त केल्या.


‘कालीधर लापता’मधील भूमिका काय?

अभिषेकने ‘कालीधर लापता’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दलही बोलला, तो म्हणाला, “या भूमिकेचं जे मला सर्वाधिक भावलं, ते म्हणजे, अधुरी राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कधीच उशीर होत नाही. याकडे मी मध्यमवयीन संकट म्हणून पाहत नाही. कारण, आपल्यापैकी अनेकांनी आपापल्या कुटुंबासाठी खूप काही त्याग केलेला असतो. आणि अखेरीस असं वाटतं की, आपण सर्व काही दिलं, पण स्वतःसाठी काहीच उरलं नाही.त्यातला साधेपणा भावला”.