AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेकांशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या, गटार छाप… हिंदू तरुणींबाबत कंगना वाट्टेल ते बोलली

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने हिंदू तरुणींबाबत चुकीचे मत मांडले आहे. तिच्या या पोस्टने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अनेकांशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या, गटार छाप... हिंदू तरुणींबाबत कंगना वाट्टेल ते बोलली
Kangana RanutImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 3:31 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बिनधास्त आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अलीकडे झालेल्या सीजेपी आंदोलनाबाबतही अभिनेत्रीने आंदोलक आणि विरोधकांवर जोरदार टीका केली होती. आता मात्र, तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद निर्माण केला आहे. यात तिने नवीन पिढीच्या महिलांबद्दल खूपच वाईट वक्तव्य केले आहे. तिने आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या असे म्हटले आहे. कंगाच्या या पोस्टमुळे सर्वत्र संताप पाहायला मिळत आहे.

काय आहे कंगनाची पोस्ट?

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने, “तरुण हिंदू स्त्रियांसाठी सर्वात लज्जास्पद बाब म्हणजे, स्वतंत्र करिअर असलेल्या स्त्रियांचे अनुकरण करण्याची इच्छा. स्वतंत्र स्त्रिया स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करतात, इतरांपेक्षा वेगळ्या वाटा निवडतात आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः निभावतात. त्या हे सर्व आपल्या पालकांच्या किंवा कुटुंबियांच्या बळावर साध्य करत नाहीत.. उलट, त्यांना हे सर्व पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावरच करावे लागते.”

Kangana Ranut Post

“मी त्यांना ‘जनरेशन गटर’ म्हणते”

पुढे कंगनाने अशा प्रकारच्या स्त्रियांना ‘जनरेशन गटर’ म्हटले. “मी त्यांना गटर पिढी म्हणते, जी तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची नवी पिढी आहे. यांचा ना अभ्यास चांगला असतो, ना त्या सुंदर असतात आणि ना त्यांची मानसिकता चांगली असते. या इतक्या भ्रष्ट मानसिकतेच्या असतात की त्या चांगली गृहिणी देखील होऊ शकत नाहीत. यांच्याकडे समाजाला देण्यासारखे काही नसते. तरीही ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात.”

“निर्लज्जपणे आपल्या आई-वडिलांच्या कमाईवर जगतात”

कंगना इतक्यावरच थांबली नाहीत. तिने पुढे स्त्रियांवर टीकेची झोड उठवली. “या स्वतंत्र न होताही सतत स्वतंत्र जीवनासाठी संघर्ष करत राहतात आणि आपल्या पालकांच्या कमाईवर जगत राहतात. स्वतंत्र आयुष्य कमावावे लागते. तुम्ही बिघडलेल्या विचारांच्या गटर छाप व्यक्ती आहात. जर तुम्ही जबाबदाऱ्या न घेता स्वतंत्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असाल तर.”

कंगनावर चिडले लोक

कंगनाच्या या पोस्टवर लोक चिडले आहेत. रेडिटवर एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, “मला वाटत नाही की लोक याच्याशी सहमत होतील.” एकाने लिहिले, “जे तिने स्वतः पूर्वी केले आहे, आता त्याच गोष्टींसाठी ती इतरांना लाजवेल.” दुसऱ्याने कमेंट करत म्हटले की, “तिने इथे पोहोचण्यासाठी जे केले ते कदाचित विसरली असेल.” तर आणखी एकाने लिहिले, “तिचा मेंदू खराब झाला आहे, दुसरे काही नाही.”

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार