अभिनेता नागार्जुन यांनी वडिलांना दिलेलं वचन केलं पुर्ण, 1080 एकर वनभूमी घेतली ताब्यात; काय होतं वचन ?

| Updated on: Feb 18, 2022 | 8:45 AM

इतकी मोठी जमीन दत्तक घेतल्यानंतर खासदार संतोष कुमार यांच्याकडून नागार्जुनचं कौतुक करण्यात आलं आहे. दत्तक घेतलेल्या जागेत झाडे लावण्यात येणार असून आज पासून त्या कार्यक्रमाला सुरूवात झाली असल्याचे खासदारांनी सांगितले.

अभिनेता नागार्जुन यांनी वडिलांना दिलेलं वचन केलं पुर्ण, 1080 एकर वनभूमी घेतली ताब्यात; काय होतं वचन ?
भूमीपूजन करीत असतानाचा फोटो
Follow us on

मुंबई – मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता नागार्जुन (nagarjuna) यांनी 1080 एकर वनभूमी दत्तक घेतली असल्याची घोषणा केली आहे. ग्रीन इंडिया चॅलेंजपासून (green india challenge) प्रेरणा घेऊन 1080 एकर वनभूमी ताब्यात घेतली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तिथं अक्किनेनी नागेश्वर राव अर्बन फॉरेस्ट पार्कची पायाभरणी करण्यात येणार असून चेंगीचेर्ला वनक्षेत्रात नागरी वन उद्यान तयार करण्यात येणार असल्याचे अभिनेता नागार्जुन यांने स्पष्ट केले. तयार होणा-या पार्कला त्यांच्या वडिलांचं नाव नागेश्वर राव अर्बन फॉरेस्ट पार्क असं देण्यात येणार आहे. ज्यावेळी तिथल्या भूमीचं पायापूजन झालं त्यावेळी तिथं अनेक मंडळी उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे पायापूजन कार्य़क्रमाला खासदार जे संतोष कुमार हे त्यांच्या कुटुंबियासोबत उपस्थित होते. तर नागार्जुनची फॅमिली सुध्दा तिथं उपस्थित असल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. अक्किनेनी नागार्जुन, अमला, मुले नागा चैतन्य आणि निखिल आणि इतर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तिथल्या वनभूमीचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार 2 कोटी रूपये देण्यात आले आहेत.

अर्बन फॉरेस्ट पार्कचं पायापूजन केल्याचा मला आनंद

सध्याचं आपल्याला आपला निसर्ग जापायचा आहे, त्यामुळे मी त्याबाबत अधिक सजग आहे. नुकताच देशात पर्यावरणास अनुकूल आणि आपले पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी ग्रीन इंडिया चॅलेंज कार्यक्रम सुरू केला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अनुशंगाने अनेक झाडांची रोपे लावण्यात आले आहेत. मागे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार संतोष कुमार यांच्याशी मी वनभूमी दत्तक घेण्याविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर आम्ही अनेकदा याविषयावर सविस्तर भेटून चर्चा केली आहे. तसेच एकदा मी एका स्टेजवर वनभूमी खरेदी करणार असल्याचं सुध्दा जाहीर सांगितलं होतं. त्यामुळे मला ही संधी सध्याच्या सरकारने दिली असल्याने मी त्यांचा ऋणी आहे. अर्बन फॉरेस्ट पार्कचं पायापूजन केल्याचा मला आनंद देखील होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. उभारण्यात येणा-या वनक्षेत्रामुळे परिसरात राहणा-या अनेक लोकांना त्याचा फायदा होईल असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी वडिलांना दिलेलं वचन पुर्ण केल्याचं म्हणलं जात आहे. कारण भूमीपूजन करीत असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नागार्जुन यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्याचे पाहायला मिळत आहे.

खासदार जे संतोष कुमार यांच्याकडून नागार्जुनचं कौतुक

इतकी मोठी जमीन दत्तक घेतल्यानंतर खासदार संतोष कुमार यांच्याकडून नागार्जुनचं कौतुक करण्यात आलं आहे. दत्तक घेतलेल्या जागेत झाडे लावण्यात येणार असून आज पासून त्या कार्यक्रमाला सुरूवात झाली असल्याचे खासदारांनी सांगितले. तसेच इतकी मोठी जमीन घेतल्याने ती अधिक सुरक्षित सुध्दा राहिलं असंही त्यांनी म्हणटले आहे.

सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, पॅनकार्डवर घेतलं कर्ज, सिबील स्कोर खराब

जेव्हा आमच्या एका नायकाला परदेशी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ‘अभिनेत्रीचा’चा पुरस्कार मिळाला होता..!

संगीतकार खय्याम यांना अभिनेता व्हायचं होतं, पण संगीतकार व्हावं लागलं