Kiara Advani आहे प्रेग्नेंट? अभिनेत्रीच्या एका फोटोमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले…

बॉलिवूडचं आणखी एक कपल होणार आई - बाबा! किआरा अडवाणी हिच्या एका फोटोमुळे चर्चांना उधाण... 'तो' फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Kiara Advani आहे प्रेग्नेंट? अभिनेत्रीच्या एका फोटोमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले...
| Updated on: Jun 25, 2023 | 1:05 PM

मुंबई | अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री लवकरच अभिनेता कार्तिक आर्यन यांच्यासोबत ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कार्तिक आणि किआरा सध्या त्यांचा आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच, कार्तिक याने क्रिती हिच्यासोबत एक फोटो शेअर केला. फोटो जयपूरमधील आहे. कार्तिकने पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल झाल्यामुळे किआरा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये किआरा हिने ऑरेंज ब्रालेटसोबत मॅचिंग ब्लेझर आणि पँट घातली आहे. मोकळ्या केसात अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. पण किआराच्या बेली फॅटने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो व्हायरल होत असल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला प्रेग्नेंट आहेस का? असं देखील विचारलं आहे…

फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘किआरा प्रेग्नेंट आहे?’, तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘किआरा मला प्रेग्नेंट वाटत आहे…’ सध्या सर्वत्र किआराच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. पण यावर किआरा किंवा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही.

दरम्यान, नुकताच झालेल्या एक मुलाखतीत अभिनेत्रीला ‘खऱ्या प्रेमा’बद्दल विचारण्यात आलं होतं. यावर किआरा म्हणाली, ‘नुकताच माझं लग्न झालं आहे. आमचं प्रेम विवाह आहे, त्यामुळे साहजीकच… मी खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवते…’ असं अभिनेत्री म्हणाली होती.

अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी ७ फेब्रुवारी रोजी शाही थाटात लग्न केलं. आजही त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय लग्नानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगत असते.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील दोघांचे फोटो पोस्ट करत किआरा – सिद्धार्थ यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सिद्धार्थ – किआरा यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘सत्य प्रेम की कथा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तर दुसरीकडे सिद्धार्थ रोहित शेट्टी याच्या ‘कॉप-सीरिज इंडियन पोलीस फोर्स ‘ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सिद्धार्थ याच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.