Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे… अभिनेते उदय टिकेकर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Laxmikant Berde: नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उदय टिकेकर यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा...

सध्या राज्यात महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स हा सिनेमा चर्चेत आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या कारनाम्यांवर आधारित हा सिनेमा असणार असे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारे उदय टिकेकर हे सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि ज्येष्ठ अभिनेत्री अशोक सराफ यांच्यासोबत काम करतानाचा किस्सा सांगितला आहे.
या मुलाखतीत उदय टिकेकर यांनी लक्ष्या आणि अशोक मामा यांच्यासोबत ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमात काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले की, ‘अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे सेटवर खूप सतवायचे. माझ्यासाठी ते सिनिअर होते. त्या काळी खूप मोठे स्टार होते. दोघेही खतरनाक होते. उगाचच खोटं खोटं मारायचे, चिमटे काढायचे. काहीतरी बोलत राहायचे मला मारताना, पण मजा यायची.’
लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोन आला अन्..
पुढे ते म्हणाले की, ‘सिनेमाच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास, नाटक करत असताना मला एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा समोरून फोन आला होता. मला ते म्हटले की, ‘या व्यक्तीला जाऊन भेट. त्यांच्याकडे मी तुझं नाव सुचवलं आहे. या सिनेमात तू हिरो म्हणून काम करणार आहेस’ डायरेक्ट असं मला त्यांनी सांगितलं. माझी कधीही त्यांची समोरासमोर भेट किंवा ओळख नाही. लक्ष्मीकांत बेर्डे तेव्हा खूप मोठे स्टार होते. मला डायरेक्ट फोन आला, मी वेडाच झालो होतो.’
शुभमंगल सावधान सिनेमाविषयी
‘शुभ मंगल सावधान’ हा मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट सिनेमांच्या यादीमधील एक सिनेमा आहे. हा सिनेमा 1992मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, उदय टिकेकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन एम.एस. साल्वी यांनी केले आहे. हा सिनेमा त्यावेळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आजही अनेकजण हा सिनेमा आवडीने पाहतात.