Alia Bhatt | आलियाचा नवा इंस्टाग्राम डीपी पाहिलात का?, कोरोनाशी लढत आठवतेय ‘ते’ दिवस…

Alia Bhatt | आलियाचा नवा इंस्टाग्राम डीपी पाहिलात का?, कोरोनाशी लढत आठवतेय ‘ते’ दिवस...
आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 13, 2021 | 11:15 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे. आलिया भट्ट त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, ज्यांची नुकतीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता आलिया तिच्या इंस्टाग्राम डीपीमुळे चर्चेत आली आहे (Actress Alia Bhatt change Instagram profile photo goest viral on internet).

आलिया भट्टला जेव्हापासून कोरोनाची लागण झाली आहे, तेव्हापासून चाहते तिला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलिया आता तिच्या आयुष्याची एक-एक झलक चाहत्यांसाठी शेअर करत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिचा इन्स्टाग्राम डीपी बदलला आहे.

आलियाने बदलला इंस्टाग्रामचा फोटो

अलीकडेच आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. अलीकडेच अभिनेत्री सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेली होती. यावेळीचा एका फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत आलिया समुद्राच्या क्रिस्टल क्लीअर निळ्या पाण्याजवळ बसलेली दिसत आहे.

या फोटोमध्ये आलिया चमकदार रंगाच्या बिकिनीमध्ये वावरताना दिसत आहे. फोटोमध्ये ती ओल्या वाळूवर बसलेली दिसत आहे. या अभिनेत्रीने आपले डोळे खाली झुकवले आहेत आणि आपले केस ठीक करताना दिसत आहे. आलियाने यापूर्वीच हा फोटो तिच्या पेजवर शेअर केला होता. आता अभिनेत्रीच्या या इंस्टाग्राम प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे (Actress Alia Bhatt change Instagram profile photo goest viral on internet).

मालदीव व्हेकेशन

गेल्या महिन्यात आलिया आपल्या गर्ल गँगसह मालदीवमध्ये गेली होती आणि तेथील बरेच फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. आता कोरोनाशी झुंज देणारी आलिया आजकाल तिच्या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत आहे. आलिया भट्टपूर्वी अभिनेता रणबीर कपूरदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते.

चित्रपटांची रांग

आलिया भट्टच्या हाती सध्या बरेच चित्रपट आहेत. आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि चित्रपट निर्माते अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. यासह ती एस.एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाद्वारे टॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

(Actress Alia Bhatt change Instagram profile photo goest viral on internet)

हेही वाचा :

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाने नाकारली शाहिद कपूरच्या चित्रपटाची ऑफर, जाणून घ्या यामागचे कारण…

Video | हुबेहूब करिश्मा कपूरसारखी दिसतेय ‘ही’ मुलगी, सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चाहतेही बुचकळ्यात!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें