Video | हुबेहूब करिश्मा कपूरसारखी दिसतेय ‘ही’ मुलगी, सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चाहतेही बुचकळ्यात!

बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांच्यासारखे दिसणारे लोक इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. बॉलिवूडच्या अभिनेत्रींबद्दल बोलायचे तर, त्यांच्या लूक-अ-लाईक नेहमीच चाहत्यांना गोंधळात टाकत असतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:32 AM, 13 Apr 2021
Video | हुबेहूब करिश्मा कपूरसारखी दिसतेय ‘ही’ मुलगी, सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चाहतेही बुचकळ्यात!
करिश्मा कपूर

मुंबई : बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांच्यासारखे दिसणारे लोक इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. बॉलिवूडच्या अभिनेत्रींबद्दल बोलायचे तर, त्यांच्या लूक-अ-लाईक नेहमीच चाहत्यांना गोंधळात टाकत असतात. अनुष्का शर्मा, प्रीती झिंटा, ऐश्वर्या रायपासून ते अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान, हृतिक रोशन, रणवीर सिंग या अनेक कलाकारांचे लूक-अ-लाईक सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता अभिनेत्री करिश्मा कपूरसुद्धा या यादीमध्ये सामील झाली आहे (Pakistani Tiktok star heena look a like of karishma kapoor trending on social media).

यापूर्वी करिश्मा कपूरच्या लूक-अ-लाईकचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण, आता पुन्हा एकदा करिश्मा कपूरची आणखी एक लूक-अ-लाईक असणारी तरुणी खूप चर्चेत आली आहे. दोघींच्याही चेहऱ्यात इतके साम्य आहे की, एखाद्याने या दोघींना पाहिले तर ते नक्कीच गोंधळात पडतील.

पाकिस्तानात राहते ही तरुणी

टिक टॉकची फेमस टिक टॉकर आणि करिश्मा कपूरची लूक-अ-लाईक हिना पाकिस्तानात खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान, हिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिना टिक टॉकचा एक प्रसिद्ध चेहरा होती, पण जेव्हा या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली तेव्हा ती पूर्णपणे गायब झाली होती. पण आता लोकांची नजर पुन्हा एकदा हिनावर पडली आहे.

(Pakistani Tiktok star heena look a like of karishma kapoor trending on social media)

हिना आता टिक टॉकच्या ऐवजी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव झाली आहे. टिक टॉकवर हिनाचे 2.9 दशलक्ष फॉलोअर्स होते, तर इंस्टावर तिचे अद्याप केवळ 36 हजार फॉलोअर्स आहेत. पण, आता पुन्हा एकदा हिनाची जादू चाहत्यांमध्ये वेगाने पसरत आहे. हिनाचा चेहरा आणि शैली बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी इतकी जुळत आहे की तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून लोकही चकित झाले आणि कमेंट करून तिची प्रशंसा केली.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

हिनाचे चाहतेदेखील तिच्याकडून करिश्मा कपूरच्या गाण्यांवर व्हिडीओ बनवण्याची मागणी करतात. कोणी तिला करिश्माची कार्बन कॉपी म्हणत, तर कोणी तिचे व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित होतात. ही पाकिस्तानी मुलगी पुन्हा एकदा चाहत्यांच्यामध्ये चर्चेत आली आहे.

(Pakistani Tiktok star heena look a like of karishma kapoor trending on social media)

हेही वाचा :

Video | जॅकी श्रॉफसोबत पूलमध्ये धमाल करताना दिसली लेक कृष्णा, पाहा व्हिडीओ

Video | ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर मोराचा हल्ला, पाहा नेमकं काय घडलं…