Anu Aggarwal : म्हातारी, शिष्टाचार शिक…वयाच्या 57व्या वर्षी बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे अभिनेत्री नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Anu Aggarwal Troll : अभिनेत्री अनु अग्रवालनं बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

‘आशिकी’ या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली अनु अग्रवाल आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नुकतीच, तिनं एका IFFA कार्यक्रमाला हजेरी लावली. ती एका पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. तिनं या ड्रेससोबत लाल रंगाचा श्रग घातला होता. अभिनेत्रीनं हेवी मेकअप आणि मोकळ्या केसांसह पोज दिली. अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक युझर्सनी शॉर्ट ड्रेस घातल्याबद्दल तिची खिल्ली उडवली.
अनु अग्रवाल ट्रोल
अनु अग्रवाल एका मिनी ड्रेसमध्ये कार्यक्रमात पोहोचली. तिनं या शॉर्ट ड्रेससोबत काळ्या रंगाच्या हाय हील्स घातल्या होत्या. पापाराझींसाठी पोज देताना तिच्या आत्मविश्वासाचं अनेकांनी कौतुक केले, परंतु काही युझर्सनी तिच्या हावभावांवर आणि ड्रेसिंग स्टाईलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काहींनी तिचा लूक बोल्ड असल्याचं म्हटलं, तर काहींनी तिच्या वयाला साजेसे कपडे न घातल्याबद्दल तिच्यावर टीका केली. एका युझरनं लिहिलं की, ती यापेक्षा चांगले कपडे घालू शकली असती, तर इतरांनी तिच्या हावभावांवर टीका केली. एका युझरनं तिला म्हातारी म्हटलं, तर दुसऱ्यानं म्हटलं की, तिच्या चेहऱ्यावर तिचं वय दिसत आहे. आणखी एकानं लिहिलं, ‘मॅडम, तुमच्या हावभावांकडे बघा.’ काहींनी म्हटलं, ‘कपडे घालण्याबद्दल थोडे शिष्टाचार शिका.’ अनेकांनी लिहिलं, ‘कपडे ठीक आहेत, पण तुम्ही अधिक चांगले हावभाव देऊ शकला असता.’
या ट्रोलिंगच्या दरम्यान, अनु अग्रवालला अनेक चाहते आणि युजर्सकडून पाठिंबाही मिळाला. लोकांनी तिच्या आत्मविश्वासाचं, फिटनेसचं कौतुक केलं.
अनु अग्रवालचे सिनेमे
दरम्यान, अनु अग्रवालनं 1990 मध्ये महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल रॉय मुख्य भूमिकेत होता. चित्रपटातील गाणी आणि दोघांची केमिस्ट्री प्रचंड लोकप्रिय झाली. या सिनेमामुळे अनु अग्रवालला ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर तिनं ‘किंग अंकल’, ‘खलनायिका’ आणि ‘थिरुडा थिरुडा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
अनु अग्रवालच्या आयुष्यात 1999 मध्ये मोठं वादळ आलं. तिचा भीषण कार अपघात झाला. या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. तिला अनेक आठवडे कोमामध्ये राहावं लागलं. तिची स्मरणशक्तीही गेली होती. शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला पुन्हा चालणं आणि सामान्य आयुष्य जगणं शिकावं लागलं. या अपघातानंतर अनुनं बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या चेहऱ्यातही बदल झाले. मात्र, योग, ध्यान, शिस्त आणि सकारात्मक विचारांच्या मदतीनं तिनं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.