Deepika Padukone Welcomes Baby: गोड बातमी! दीपिका झाली दुसऱ्यांदा आई, मुलगा झाला की मुलगी? पोस्ट करून दिली खुशखबर
Deepika Padukone Welcomes Baby: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे हे गूडन्यूज दिली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण ही गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाने दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे सांगितले होते. आता दीपिकाच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकाने ही आनंदाची बातमी दिली आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी स्वतः चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. त्यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकलीचे आगमन झाले आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलगी दुआनंतर जोडप्याच्या घरात पुन्हा लक्ष्मी आली आहे, त्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी स्वतः दुसऱ्यांदा पालक होण्याची बातमी कन्फर्म केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात बाळाच्या पायाचा ठसा छापलेला आहे. हे शेअर करताना जोडप्याने सांगितले की त्यांच्या घरात नव्या पाहुणीचे आगमन झाले आहेृ. त्यानंतर सोशल मीडियावर लोक त्यांना खूप शुभेच्छा देत आहेत.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घ्यायला गेले होते दीपिका-रणवीर
एक दिवस आधीच दीपिका आणि रणवीर सिंह यांना सिद्धिविनायक मंदिरात स्पॉट केले गेले होते. जोडपे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते आणि या दरम्यान दोघेही त्यांच्या लूकमुळे खूप चर्चेत होते. रणवीर दीपिकाची खूप काळजी घेत असल्याचे दिसत होते. आता बाप्पाच्या आशीर्वादानंतरच रणवीर सिंह आणि दीपिका घरी मुलीचे स्वागत करत आहेत.
दीपिका आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा १९ एप्रिल २०२६ रोजी केली होती. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दुसऱ्या प्रेग्नन्सीची पोस्ट शेअर केली होती. दीपिका आणि रणवीर सिंह यांनी अलीकडेच मुलगी दुआचा वाढदिवसही साजरा केला होता आणि तिचा चेहराही रिवील केला होता. दीपिका आणि रणवीर यांनी १४-१५ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्न केले होते आणि त्यानंतर ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुलगी दुआचा जन्म झाला. आता १९ सप्टेंबरला जोडप्याने दुसऱ्या मुलीचे स्वागत केले आहे.