
केरळमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध अभिनेत्रीवर एका IT कर्मचाऱ्याचं अपहरण आणि मारहाण केल्याचे गंभीर आरोप आहे… संबंधित घटला एर्नाकुलम नॉर्थ येथे घडली आहे… ज्या अभिनेत्रीविरोधत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री लक्ष्मी मेनन आहे. लक्ष्मी विरोधात IT कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे… पण आता अभिनेत्री फरार असल्याची माहिती मिळत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्री आणि IT कर्मचारी यांच्यामध्ये एका बारमध्ये वाद सुरु झाले.
अभिनेत्री लक्ष्मी मेनन विरुद्धची तक्रार अलुवा येथील रहिवासी अलियार शाह सलीम नावाच्या कर्मचाऱ्याने दाखल केली आहे. अलियारने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तो शहरातील एका बारमध्ये गेला होता. लक्ष्मी मेनन, मिथुन, अनीश आणि आणखी एक महिला मित्र तिथे उपस्थित होते.
कर्माचाऱ्याने आरोप केल्यानुसार, लक्ष्मी मेन हिच्यासोबत काही लोकं देखील असून ते नशेत होते. त्यांनी बळजबरी IT कर्मचाऱ्यासोबत बारमध्ये भांडण केलं आणि निघून गेले. बारमधून निघाल्यानंतर, लक्ष्मी मेनन हिने मित्रासोबत मिळून IT कर्मचाऱ्याच्या गाडीचा पाठलाग केला…
दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, ही घटना रात्री जवळपास 11.45 वाजता नॉर्थ रेल्वे याठिकाणी घडली.. अभिनेत्री आणि तिच्या मित्रांनी IT कर्मचाऱ्याची गाडी थांबवली आणि त्याला गाडीतून बाहेर काढलं आणि अभिनेत्रीने स्वतःच्या कारमध्ये घातलं… त्यानंतर IT कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर धमकी देत त्याला अलुवा-पराउर जंक्शन येथे धक्का मारून पळवून लागवं. सीटीटीव्हीमुळे सर्व घटना समोर आली आहे… पोलीस सध्या संबंधित प्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहेत.
लक्ष्मी मेननचा त्यात सहभाग असल्याने ही घटना हायप्रोफाइल झाली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. लक्ष्मी मेननचा चौकशीसाठी शोध सुरू आहे, सध्या ती फरार आहे.
केरळमधील त्रिपुनिथुरा येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मीने 2011 मध्ये दिग्दर्शक विनयन यांच्या राघविनाते स्वंथम रझिया या सिनेमातून मल्याळम सिनेविश्वात पदार्पण केलं. अभिनेत्रीने ‘सुंदरपांडियन’, ‘कुट्टी पुली’, ‘जिगर्थंडा’, ‘मिरुथन’ यांसारख्ये अनेक मल्याळम आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.