
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टींग काऊचचा अनुभव सांगितला आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची देखील नावे आहेत ज्यांनी त्यांना आलेल्या अशा विचित्र अनुभवांबद्दल सांगितले आहे. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने तिला आलेल्या अशाच एका कास्टिंग काउच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. एका डायरेक्टरने चक्क तिच्याजवळ नाईटीमध्ये येण्याची डिमांड केली होती.तेही काम मिळण्यासाठी. एका मुलाखतीदरम्यान तिने हा प्रसंग सांगितला आहे.
ही अभिनेत्री म्हणजे माही गिल. माहीचा आज 19 डिसेंबर रोजी 50 वा वाढदिवस आहे. तिने “साहेब बीवी और गँगस्टर”, “पान सिंग तोमर” आणि लोकप्रिय वेब सिरीज सारख्या चित्रपटांमध्ये जटिल, शक्तिशाली आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. तिच्या स्पष्टवक्त्यामुळे तिला “कंट्रोव्हर्सी क्वीन” असे टोपणनाव मिळाले आहे. कास्टिंग काउचसारख्या संवेदनशील मुद्द्यावर तिने स्पष्टवक्तेपणे केलेल्या टिप्पण्यांसाठी तिला हा टॅग मिळाला आहे.
एका मुलाखतीत तिने सांगितले की कास्टिंग काउच इंडस्ट्रीत अस्तित्वात आहे, पण ते सर्वत्र आणि सर्वांबाबतीतच घडते असे नाही. तिने स्पष्ट केले की परिस्थिती, तडजोड आणि वैयक्तिक निर्णय अशा अनेकदा भूमिका बजावतात. ती कोणत्याही मुद्द्यावर अगदी स्पष्टपणे तिचे मत मांडते. त्यामुळे नेहमीच चर्चेत राहीली आहे. 2018 मध्ये, जेव्हा माहीचा “साहेब बीवी और गँगस्टर 3” चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, माही गिल तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देत खूप भावनिक झाली होती. एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचबद्दलचा खुलासा केला होता.
त्या मुलाखतीत तिने तिचा अनुभव सांगितला ती म्हणाली, तिला दिग्दर्शकाचे नाव आठवत नाही, परंतु तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला घडलेली एक घटना तिला नेहमीच आठवेल. तिने स्पष्ट केले की जेव्हा ती चित्रपटांमध्ये येण्यासाठी संघर्ष करत होती, तेव्हा ती त्या दिग्दर्शकाला साधा-सिंपल पंजाबी सूट घालून भेटायला गेली होती. माहीला सूटमध्ये पाहून दिग्दर्शकाला थोडे अस्वस्थ वाटले. माहीला पाहताच तो म्हणाला, “जर तू असा सूट घालून आलीस तर तुला कोणीही चित्रपटात काम देणार नाही.” तर अजून एका दिग्दर्शकाने तिला नाईटीत पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. दिग्दर्शकाने माही गिलला सांगितले, “मला तू नाईटीत कशी दिसतेस ते पहायचे आहे.” माहीने पुढे सांगितले की हा अनुभव तिच्यासाठी अतिशय वाईट होता. ती यामुळे खूप निराश झाली होती. तिने सांगितले की तिने पुन्हा कधीच त्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम केले नाही किंवा पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला नाही.
दरम्यान माही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील तेवढीच स्पष्ट बोलताना दिसते. माहीने 2019 मध्ये तिच्या दुसऱ्या लग्नाचा खुलासा केला तेव्हा ती चर्चेत आली. तिने रवी केसरशी दुसरे लग्न केले असून त्यांना वेरोनिका नावाची एक मुलगी देखील आहे. लग्नानंतर ती गोव्यात राहायला गेली. लग्नापूर्वी हे जोडपे 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. माही गिलचे पहिले लग्न वयाच्या 17 व्या वर्षी झाले होते, परंतु ते अयशस्वी झाले आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. तिने कधीही तिचे पहिले लग्न कोणाशी झाले हे उघड केलेले नाही.
माही तिच्या पती आणि मुलीसोबत गोव्यात राहते. ती शेवटची दुर्गावती चित्रपटात आणि ‘अपहरण 2’ वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती. येत्या काळात माही ‘रक्तांचल 2’ या वेब सीरिजमध्ये देखील दिसणार आहे. या वेब शोमध्ये ती एका शक्तिशाली राजकारण्याची भूमिका साकारत आहे. तिच्याकडे फिक्सर ही वेब वेबसीरिज देखील आहे.