वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार, अभिनेत्री संभावना सेठकडून रुग्णालयाविरोधात कायदेशीर कारवाई!

| Updated on: May 31, 2021 | 12:15 PM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavana Seth) हिने आपल्या वडिलांना गमावले आहे. 8 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे संभावना सेठच्या वडिलांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार, अभिनेत्री संभावना सेठकडून रुग्णालयाविरोधात कायदेशीर कारवाई!
संभावना सेठ
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूमुळे बर्‍याच लोकांनी आपले प्रियजन आणि आप्तस्वकीय गमावले आहेत. काही जण अद्याप यातून सावरलेले नाहीत. या दुसऱ्या लाटेत अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavana Seth) हिने आपल्या वडिलांना गमावले आहे. 8 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे संभावना सेठच्या वडिलांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता या अभिनेत्रीने रुग्णालयाला थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे (Actress Sambhavana Seth send legal notice to hospital after her father died).

टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात संभावनाने सांगितले की, या रुग्णालयात रुग्णांची योग्य काळजी घेतली जात नाही, त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच योग्य उत्तर देत नसल्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे.

ते दृश्य पाहून धक्का बसला!

संभावनाने म्हटले की, कोरेना पॉझिटिव्ह आल्यानंतर चार दिवसांनी 30 एप्रिल रोजी माझ्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर वैद्यकीय कर्मचार्‍यांनी त्यांच्या काही रक्त चाचण्या घेतल्या आणि काही दिवसातच ते बरे होतील अशी ग्वाही दिली. आमचे वडील सुरक्षित हातात असल्याचे आम्हाला जाणवले, म्हणून आम्ही देखील शांत झालो. काही दिवसांनंतर माझा भाऊ वडिलांना भेटायला गेला, तेव्हा त्यांचे हात बांधलेले पाहून आम्हाला धक्का बसला. त्याने लगेच पप्पांचे हात उघडले आणि रुग्णालयाकडे त्याबद्दल चौकशी केली. तर, त्यांनी सलाईन काढू नये, म्हणून तसे केले आहे, असे सांगण्यात आले (Actress Sambhavana Seth send legal notice to hospital after her father died).

संभावना पुढे म्हणाली की, ‘7 मे रोजी अचानक माझ्या भावाचा मला फोन आला की, वडिलांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. त्यावेळी, त्यांची ऑक्सिजन पातळी 90-95च्या दरम्यान होती. मला वाटलं की, काहीतरी चुकतं आहे आणि दुसर्‍याच दिवशी दिल्लीला गेले. जेव्हा मी रुग्णालयात गेले आणि माझ्या वडिलांना पाहिले तेव्हा त्यांचे हात पाय बेडवर बांधलेले होते. मला देखील भावाला दिलेले कारण दिले गेले. माझ्या वडिलांच्या देखरेखीसाठी तिथे कुणीही नव्हते आणि तिथल्या वैद्यकीय सुविधा पाहून मला धक्का बसला. मी हा मुद्दा हायलाईट करण्यासाठी एक व्हिडीओ देखील बनवला होता, परंतु, कर्मचार्‍यांनी मला तो व्हिडीओ हटवण्यासाठी भाग पडले. माझ्या वडिलांची प्रकृती पाहून मी वरिष्ठ डॉक्टरांना भेटण्यासाठी धाव घेतली, पण ते भेटू शकले नाहीत.’

वडिलांच्या मृत्यूची चौकशी करणार!

‘त्यानंतर एका डॉक्टरांनी मला सांगितले की, त्यांची तब्येत ठीक आहे आणि त्यांची देखभाल करण्यासाठी एक अटेंडंट देखील नेमण्यात आला होता. त्याच्या काही सेकंदांनंतर, त्याने मला सांगितले की माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मला त्यांना पहायचे होते, परंतु रुग्णालय प्रशासनाने मला थांबवले आणि ते उपचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्याच्या काही वेळानंतर मला सांगण्यात आले की, तीव्र झटक्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मला वाटते की, माझ्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे, हे त्यांना माहित होते. याचमुळे या सगळ्या प्रकारची चौकशी व्हावी म्हणून रुग्णालयाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे,’ असे संभावना सेठ म्हणाली.

(Actress Sambhavana Seth send legal notice to hospital after her father died)

हेही वाचा :

Joe Lara | ‘टार्झन’ फेम अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू, पत्नीसमवेत आणखी पाच जणांचा बळी

Kangana Ranaut | कंगना रनौतचं देवदर्शन, परिवारासमवेत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात! पाहा फोटो..