कोट्यवधींची मालकीण, पण आई-भावाने घरातून हाकललं, नातं तोडलं, अभिनेत्रीवर मुंबई सोडण्याची वेळ; आता…
लॉकअप सीजन 2 या रिॲलिटी शोची जोरदार चर्चा आहे. राम कपूर, सुनिता अहुजा, शिल्पा शिंदे सह अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेत. त्याचदरम्यान एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्याबद्दल अतिशय नमोठा खुलासा करत शॉकिंग सीक्रेट सर्वांसमोरच सांगितलं.

‘लॉकअप सीजन 2’ हा रिॲलिटी शो सुरू झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत होता, मात्र आता हा शो अंतिम टप्प्यात आला असून थोड्याच काळात त्याचा फिनाले पार पडणार आहे. राम कपूर, सुनिता अहुजा, शिल्पा शिंदे, आकांक्षा चमोला यांसह अनेक सेलिब्रिटींनी या शोच्या दुसऱ्या भागात सहभाग घेतला. त्यामुळे या शोची बरीच चर्चा झाली. मात्र आता फिनालेपूर्वी या शोमध्ये अनेक ट्विस्ट दिसत आहेत. लॉकअप 2 चा लेटेस्ट भागही खूप धमाकेदार होता. प्रत्येक स्पर्धकाला एकमेकांची काही सीक्रेट्स माहीत आहेत. मात्र दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी त्यांना ती उघड करावी लागली. आधीच्या भागात राम कपूर आणि शिल्पा शिंदे यांनी त्यांची गुपित उघड केली. मात्र ते ऐकून सगळेच अवाक् झाले.
शिल्पा शिंदेचं शॉकिंग सिक्रेट
‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतून अभिनेत्री सिल्पा शिंदे घराघरांत पोहोचली, अतिशय प्रसिद्ध झाली. लॉकअप 2 मध्ये सध्या ती सहभागी असून यावेळी तिने तिच्या आयुष्यातील एक मोठं सत्य सांगितल. मात्र तिचं बोलणं ऐकून अनेक जण भावूक झाले. कुटुंब असूनही मी अनाथ आहे. माझ्या भावाने मला घराबाहेर काढलं, त्यामुळेच मी कर्जतमध्ये एकटी राहते, असा मोठा खुलासा शिल्पाने यावेळी केला. तिची कहाणी ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्यांच्याकडे कोणी आधार नाही अशा लोकांसाठी एक निवारा (शेल्टर होम) उभारता यावा, यासाठी मी ‘लॉकअप’ या शोमध्ये सहभागी झाले, असंही शिल्पाने उघड केलं.
कुटुंब असूनही मी अनाथ
“लोकं म्हणतात की त्यांच्याकडे कुटुंब आहे. काही लोकांकडे कुटुंब नसतं. पण माझ्याकडे कुटुंब असूनही मी अनाथ आहे. हे मी सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत नाही. मी जेव्हा मुंबईत येते, तेव्हा शेल्टर हाऊसमध्ये राहते. कर्जत मी सेकंड दोम म्हणून घेतलं होतं, पण आता तेच माझे पहिले घर झाले आहे” असं म्हणत शिल्पाने तिची व्यथा कथन केली.
मुंबई सोडली
“मी मुंबई सोडली आहे. तीन वर्षांपूर्वी माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. माझा भाऊ त्याच्या पत्नीच्या प्रभावाखाली आला. माझ्या आईनेही भावाचं ऐकलं. माझ्या ऑपरेशननंतर पाचव्या दिवशी मला माझ्याच घरातून बाहेर काढण्यात आलं. परिस्थिती तशी निर्माण झाली. त्यांना माहिती होतं की मी स्वाभिमानी मुलगी आहे. रात्री 11 वाजता मी माझं घर सोडलं. माझ्या आईने मला थांबवले नाही, कारण ती भावाच्या प्रभावाखाली होती.” असं शिल्पाने या शोमध्ये बोलताना सांगितलं. “जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कायम उपलब्ध असता, तेव्हा लोक तुमचा वापर करतात. मी माझ्याच घराचं पायपुसणं झालं होतं,” अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली
जेव्हा मी मुंबईत येऊन हॉटेलमध्ये राहते, तेव्हा लोकं मला त्याबद्दल विचारात, तेव्हा मी बहाणा करून सांगते की, “माझ्या घरी खूप लोक आले आहेत, त्यामुळे प्रायव्हसीसाठी मी इथे राहते.” असंही शिल्पाने यावेळी नमूद केलं. मी आता त्या लोकांशी कधीच बोलणार नाहीत. मी माझं इच्छापत्र (मृत्यूपत्र) लिहून ठेवलंय, त्यात कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचे नमूद केलं,. असंही शिल्पाने यावेळी बोलताना उघड केलं.
किती दिवस झाले आईला भेटलेच नाही
यावेळी बोलतानाशिल्पा खूप भावूक झाली होती. “मी आईला खूप दिवसांपासून भेटलेले नाही. आई भेटत नाही, कर्जतला येण्यासाठी ती अनेक कारणे सांगतं. फक्त फोनवर बोलणं होतं. सगळे म्हणतील की माझीच चूक आहे, काही हरकत नाही. पण सत्य एवढेच आहे की मी इतकी वाईट आहे की मला माझ्याच घरातून बाहेर काढण्यात आले.” असं शिल्पाने यावेळी सांगितलं.
मात्र शिल्पाचं हे बोलणं, तिची व्यथा ऐकून आकांक्षा, अपूर्वा मखिजा यांच्यासह शोमधील बहुतांश स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्याच्या या टप्प्यावर शिल्पा एकटी आहे. 48 वर्षांच्या शिल्पाने अजूनही लग्न केलेलं नाही. कर्जतमधील तिच्या फार्म हाऊसमध्ये ती एकटीच राहते. शोमध्ये तिचा हा खुलासा ऐकून चाहतेही भावूक झाले.