
अभिनेत्री स्वरा भास्कर ही सध्या प्रेग्नेंट आहे. काही दिवसांपूर्वीच खास फोटोशूट स्वरा भास्कर हिने शेअर केले होते. स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद फोटोंमध्ये दिसत होते.

नुकताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये स्वरा भास्कर ही पती फहाद अहमद याला मिस करताना दिसत आहे.

स्वरा भास्कर हिने पोस्ट शेअर करत लिहिले की, फहाद अहमद मला तुमची खूप जास्त आठवण येत आहे. लवकर या..मी वादा करते की, परत कोणत्या शूटला पोज नाही द्यायला लावणार

या पोस्टसोबतच स्वरा भास्कर हिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. या पोस्टवरून हे स्पष्ट होत आहे की, स्वरा भास्कर फहाद अहमद याच्यापासून दूर आहे.

फहाद अहमद हिने काही दिवसांपूर्वीच जाहिर केले की, ती प्रेग्नेंट आहे. लग्नानंतर स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती.