आठ वर्षाने मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात ‘ही’ अभिनेत्री, लग्नाबद्दल थेट म्हणाली…
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. करण आणि तेजस्वी प्रकाश यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जात होते. आता नुकताच एक मुलाखत तेजस्वी प्रकाश हिने दिली असून त्यामुळे ती चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी यांची पहिली भेट ही बिग बॉसच्या घरात झाली. विशेष म्हणजे तेंव्हाच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एकसोबत स्पॉट होताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

आता पहिल्यांदाच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. तेजस्वी प्रकाश हिच्या आईने करण आणि तेजस्वीच्या लग्नाबद्दल खुलासा केलाय.

तेजस्वी प्रकाश हिचे लग्नाचे वय झाले आहे म्हणताच तिची आई म्हणाली की, होय मुलगा ही चांगला मिळाला आहे लग्नासाठी. आईचे बोलणे ऐकून तेजस्वी पुढे म्हणते की, नाही नाही मुलगा शोधायचा आहे.

तेजस्वी प्रकाश हिची आई करण कुंद्रा याच्याबद्दलच बोलत असल्याचा अंदाजा लोकांनी लावला आहे. करण कुंद्रा हा कायमच तेजस्वी प्रकाश हिच्या घरी जातो.