
मुंबई : बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचं फार जुनं नातं आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचं नाव अंडरवर्ल्ड डॉनसोबत जोडण्यात आलं. अंडरवर्ल्ड डॉनसोबत नाव जोडलं गेल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडमधून अचानक गायब झाल्या. अनेक अभिनेत्री यशाच्या शिखरावर असताना डॉनसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आल्या. त्यानंतर अभिनेत्रींचं करियर संपलं आणि अभिनेत्री देश सोडून निधून गेल्या. अंडरवर्ल्डच्या डॉनसोबत असलेल्या अभिनेत्री आता कुठे आहेत? जाणून घेवू…
अभिनेत्री ममता कुलकर्णी : ममता कुलकर्णी ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांना घायाळ केलं. करियर यशाच्या शिखरावर असताना ममताचं नाव ड्रग्स माफिया विकी गोसावी याच्यासोबत जोडण्यात आलं. 2017 मध्ये ठाणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. विकी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, माझा कल अध्यात्माकडे वळला आहे. आता ममता नव्याने आयुष्य जगत आहे.
हीना कौसर : हीना कौसर एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होती हीना फिल्ममेकर आसिफ यांची मुलगी होती. ९० च्या दशकात जेव्हा अभिनेत्रीचं नाव गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्यासोबत जोडण्यात आलं, तेव्हा अनेक चर्चांनी जोर धरला. त्यानंतर अभिनेत्री विवाहानंतर इक्बालसोबत परदेशी गेली. एवढंच नाही, तर इक्बालच्या निधनानंतर हीना भारतात आली नाही. ती अमेरिकेत आयुष्य जगत आहे.
सोना मस्तान मिर्झा : सोना मस्तान मिर्झाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाय ठेवला, तेव्हा तिची ओळख मधुबाला यांच्यानावाने झाली. कारण सोना हुबेहूब मधुबाला यांच्याप्रमाणे दिसत होती. तेव्हा डॉन हाजी मस्तान मधुबाला यांच्या प्रेमात होता. पण त्यांतं नातं कधीही होवू शकलं नाही. त्यानंतर सोनाने हाजी मस्तान सोबत लग्न केलं. सांगायचं झालं तर अनेक वर्षांनंतर अभिनेत्री अजय देवगन स्टारर वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई सिनेमात दिसली.
मोनिका बेदी : जेव्हा मोनिका बेदी यशाच्या उच्च शिखरावर होती, तेव्हा तिचं नाव डॉन अबु सलेम याच्यासोबत जोडण्यात आलं. रिपोर्टनुसार दोघांनी लग्न देखील केलं आणि अभिनेत्रीने स्वतःचा धर्म बदलला. मोनिकाने एका मुलाखतीत अबूसोबतच्या तिच्या नात्याचा खुलासाही केला होता. शिवाय तुरुंगात असताना तिने गीता देखील वाचली.
मंदाकिनी- अभिनेत्री मंदाकिनी हिला बॉलिवूडमध्ये हवं तसं करियर करता आलं नाही. ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमातून अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळाली पण त्यानंतर मंदाकिनीला अपयशाचा सामना करावा लागला. पण अंडरवर्ल्ड डॉन दाऊतसोबत जेव्हा मंदाकिनीचं नाव जोडण्यात आलं, तेव्हा अभिनेत्री तुफान चर्चेत आली. दाऊदसोबतच्या त्याच्या नात्याचा अभिनेत्रीच्या कारकिर्दीवर वाईट परिणाम झाला. 1996 नंतर ती इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली. तिने बौद्ध धर्म स्वीकारला आणि विवाहित जीवन जगू लागली. सध्या ती भारतात आहे.