Ramayana Box Office Collection Day 10: आदिनाथ कोठारेचा सिनेमा थांबायचे नावच घेईन, १० दिवसांत केला नवा विक्रम

Ramayana Box Office Collection Day 10: मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला रामायण हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. आता या चित्रपटाने 10 व्या दिवशी नवा विक्रम केला आहे.

Ramayana Box Office Collection Day 10: आदिनाथ कोठारेचा सिनेमा थांबायचे नावच घेईन, १० दिवसांत केला नवा विक्रम
Ramayana
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 15, 2026 | 7:59 AM

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या ‘रामायण: पार्ट १’ने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. ९व्या दिवशी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ४७.८५ कोटींची कमाई केली आणि आता शनिवारीही बॉक्स ऑफिसवर आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या कमाईत १०व्या दिवशी, म्हणजे शनिवार १४ नोव्हेंबरला १३ नोव्हेंबरच्या तुलनेत वाढ दिसून आली. यासोबतच भारतात चित्रपटाची एकूण कमाई ६५० कोटी रुपयांच्या आकड्याला पार करून गेली आहे. ट्रेड ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ (Sacnilk) च्या अंदाजानुसार, चित्रपटाने १०व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ७१.५० कोटींची कमाई केली आणि जगभरात १२०० कोटींचा आकडा पार केला आहे. यासोबतच चित्रपट देशातील सातवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

यशच्या ‘केजीएफ: चॅप्टर २’च्या १२१५ कोटींच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकत आता ‘रामायण’ देशातील सातवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. १२३० कोटींसह ‘आरआरआर’ सहाव्या क्रमांकावर, रणवीर सिंह स्टारर ‘धुरंधर’ १३०७ कोटींसह पाचव्या क्रमांकावर, १७४२ कोटींच्या कमाईसह ‘पुष्पा: द रूल’ चौथ्या क्रमांकावर, १७८८.०६ कोटींसह प्रभासचा ‘बाहुबली २’ तिसऱ्या क्रमांकावर, १८१३.३९ कोटींसह ‘धुरंधर २’ दुसऱ्या क्रमांकावर आणि २०७०.३ कोटींसह आमिर खानचा ‘दंगल’ पहिल्या क्रमांकावर आहे.

Loading...

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची वाढलेली कमाई

सॅकनिल्कनुसार, ‘रामायण: राइज ऑफ अ लीजेंड’ने शनिवार, १४ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर ७१.५० कोटींची नेट कमाई केली आहे, तर शुक्रवारी चित्रपटाने ४८.१० कोटी रुपये नेट कलेक्शन केले. म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी त्याच्या कमाईत वाढ दिसून आली. यासोबतच चित्रपटाची एकूण देशांतर्गत नेट कमाई ६८४.२५ कोटी रुपये झाली आहे, तर भारतात तिचे एकूण ग्रॉस कलेक्शन ८१७.९५ कोटी रुपये झाले आहे. आता सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या ११व्या दिवसाच्या कलेक्शनवर, म्हणजे दुसऱ्या रविवाराच्या कमाईवर आहे.

‘रामायण’ सिनेमाची भाषेनुसार कमाई

भाषेनुसार चित्रपटाच्या कमाईची बाब पाहिल्यास १०व्या दिवशी ‘रामायण’ने हिंदीत १७,५४० शोजमधून ५३.०० कोटी, कन्नडमध्ये ८६८ शोजमधून ५.०० कोटी, तमिळमध्ये ९४६ शोजमधून ४.७५ कोटी आणि तेलुगूमध्ये ७०० शोजमधून ४.१५ कोटींची कमाई केली. यासोबतच भारतात आतापर्यंतचे एकूण ग्रॉस कलेक्शन ८१७.९५ कोटी आणि एकूण नेट कलेक्शन ६८४.२५ कोटी झाले आहे. जगभरात या चित्रपटाने १२२६.४५ कोटींचा आकडा गाठला आहे. यासोबतच रणबीर कपूरच्या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ (११६० कोटी) आणि यशच्या ‘केजीएफ: चॅप्टर २’ (१२१५ कोटी) च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे. याआधी ‘रामायण’ने प्रभासच्या ‘कल्कि २८९८ एडी’ (१०४२ कोटी) आणि शाहरुख खानच्या ‘पठान’ (१०५५ कोटी) च्या रेकॉर्डलाही मागे टाकले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us