Adinath Kothare Ramayana : परदेशातही आदिनाथ कोठारेच्या रामायणाचा डंका! थायलंड – मलेशियात कोट्यावधींची कमाई , पठाण – जवान सिनेमांनाही चारली धूळ

आदिनाथ कोठारे, रणबीर कपूर,साई पल्लवी आणि यश यांच्या रामायण या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात तर या चित्रपटाने कमाईचे मोठे आकडे गाठलेच आहेत.पण आता परदेशातही चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतोय

| Updated on: Nov 13, 2026 | 4:12 PM
1 / 7
आदिनाथ कोठारे, रणबीर कपूर,साई पल्लवी आणि यश यांच्या रामायण या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात तर या चित्रपटाने कमाईचे मोठे आकडे गाठलेच आहेत.पण आता परदेशातही चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे ज्या देशांमध्ये रामायणाची कथा पिढ्यांपिढ्या सांगितली जाते. तिथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.नेपाळमध्ये तर या चित्रपटाने 'जवान', 'पठान' सारख्या चित्रपटांच्या कमाईला मागे टाकलं आहे.

आदिनाथ कोठारे, रणबीर कपूर,साई पल्लवी आणि यश यांच्या रामायण या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात तर या चित्रपटाने कमाईचे मोठे आकडे गाठलेच आहेत.पण आता परदेशातही चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे ज्या देशांमध्ये रामायणाची कथा पिढ्यांपिढ्या सांगितली जाते. तिथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.नेपाळमध्ये तर या चित्रपटाने 'जवान', 'पठान' सारख्या चित्रपटांच्या कमाईला मागे टाकलं आहे.

2 / 7

इंडोनेशियात पहिल्याच दिवशी दमदार कमाई : रामायण 11 नोव्हेंबर रोजी इंडोनेशियातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. स्थानिक बॉक्स ऑफिस ट्रॅकर्सच्या अंदाजानुसार, चित्रपटाने पहिल्याचद दिवशी 1 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 90 लाख रूपयांची कमाई केली. भारतीय चित्रपटांसाठी इंडोनेशियातील ही मोठी ओपनिंग असल्याचं सांगितलं जात आहे. इंडोनेशियामध्ये रामायणाच्या कथेच्या सांस्कृतिक वारसा असल्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून आली.

3 / 7

थायलंड आणि मलेशियातही कोट्यावधींचा गल्ला :थायलंडमध्ये चित्रपटाने एका आठवड्यात जवळपास 10 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 9 कोटी रूपयांची कमाई केल्याचा अंदाज आहे. इथे रामायणाची कथा 'रामकियन' या नावाने ओळखली जाते. मलेशियातही चित्रपटाने एका आठवड्यापेक्षा कमी काळात जवळपास 9 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 8 कोटी रूपये कमावल्याचं वृत्त आहे.

4 / 7

कंबोडिया :कंबोडियामध्ये चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये सुमारे 1.5 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 1.3 कोटी रूपयांची कमाई केली. तिथे रामायणाची कथा 'रीमकर' म्हणून ओळखली जाते.

5 / 7

वियतनाममध्येही भारतीय चित्रपटाचा विक्रम :वियतनाममध्ये भारतीय चित्रपटांना साधारणपणे फार मोठा व्यवसाय करता येत नाही. अनेक चित्रपटांनी तिथे 20 हजार डॉलरचा आकडाही पार करता आलेला नाही. मात्र, 'रामायण'ने आतापर्यंत सुमारे 3.5 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी रूपयांची कमाई केल्याचा अंदाज आहे.

6 / 7

नेपाळमध्ये 'जवान' आणि 'पठाण'ला मागे टाकलं :नेपाळमध्ये 'रामायण' ने आठ दिवसांत 12.80 कोटी नेपाळी रूपये म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 8 कोटी रूपये कमावले आहेत. या कमाईसह चित्रपट नेपाळमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 'RRR', 'पठाण', आणि 'जवान' या चित्रपटांच्या कमाईला मागे टाकलं आहे. आता त्याचं लक्ष बाहूबली 2 च्या नेपाळमधील 25.20 कोटी रूपयांच्या कमाईकडे लागलं आहे.

7 / 7

दरम्यान रामायणं ने आठ दिवसांत जगभरात 1, 000 कोटी रूपयांचा टप्पा पार केल्याचं वृत्त आहे.भारताकडेही मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपटाची कमाई आणखी किती वाढणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us