AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाद्यवृंद नाही, संगीत नाही, फक्त टाळी! कुमार सानूने ‘असं’ रेकॉर्ड केलं होतं सुपरहिट गाणं, कपल्सचं ऑलटाईम फेव्हरेट

बॉलिवूडचे अनेक गायक प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे कुमार सानू. त्यांच्या गाण्यांचे चाहतेही अख्ख्या जगभर आहेत. पण त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत एक असा किस्सा घडला होता, जो कदाचित अनेकांना माहितीही नसेल, चला तर मग जाणून घेऊ...

वाद्यवृंद नाही, संगीत नाही, फक्त टाळी! कुमार सानूने 'असं' रेकॉर्ड केलं होतं सुपरहिट गाणं, कपल्सचं ऑलटाईम फेव्हरेट
kumar sanu songsImage Credit source: social media
| Updated on: Nov 13, 2026 | 4:02 PM
Share

एखादं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी मोठा वाद्यवृंद, संगीतकारांची फौज आणि तासनतास चालणारा सराव लागतो, असंच आपल्याला नेहमी वाटतं. पण कधी कधी अगदी साध्या आणि अनोख्या पद्धतीनेही इतिहास रचला जाऊ शकतो. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या कारकिर्दीत असाच एक रंजक प्रसंग घडला आहे. एका गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी स्टुडिओत ना कोणतं संगीत होतं, ना वाद्यांचा आवाज. समोर फक्त संगीतकार अनु मलिक उभे होते आणि ते बोटांनी टाळी वाजवून ताल देत होते. याच साध्या तालावर कुमार सानूने ते संपूर्ण गाणं रेकॉर्ड केलं होतं.

बोटांच्या तालावर पूर्ण केलं रेकॉर्डिंग

साल २०१५ मध्ये आलेल्या ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातील ‘दर्द करारा’ हे त्या गाण्याचं नाव होतं. या भन्नाट रेकॉर्डिंगचा किस्सा खुद्द कुमार सानूने एका मुलाखतीत सांगितला होता.

चित्रपटातील मुख्य पात्र कुमार सानूचा निस्सीम चाहता असतं, त्यामुळे दिग्दर्शक शरत कटारिया यांनी या गाण्यासाठी अस्सल कुमार सानूचाच आवाज हवा असा हट्ट धरला होता. जेव्हा प्रत्यक्ष रेकॉर्डिंगची वेळ आली, तेव्हा संगीतकार अनु मलिकने स्टुडिओत मायक्रोफोनसमोर उभे राहून थेट बोटांच्या चिमटीने (टाळीने) ताल धरण्यास सुरुवात केली. त्याच तालावर आणि सुरावटीवर कुमार सानूने ते गाणं अप्रतिमपणे गायलं. विशेष म्हणजे, त्या वेळी स्टुडिओमध्ये फक्त अनु मलिक, कुमार सानू आणि रेकॉर्डिस्ट एवढीच मोजकी मंडळी उपस्थित होती.

नंतर जोडला गेला १०० संगीतकारांचा वाद्यवृंद

कुमार सानूने या आठवणीबद्दल बोलताना सांगितलं होतं की, सुरुवातीला हे गाणं पूर्णपणे केवळ अनु मलिकच्या बोटांच्या तालावर रेकॉर्ड करण्यात आलं होतं. नंतर मात्र, गाण्याची गोडी आणि प्रभाव वाढवण्यासाठी फायनल गाणं तब्बल १०० संगीतकारांच्या भव्य वाद्यवृंदाची साथ मिळाली.

त्यामुळे पडद्यावर आयुष्यभर कुमार सानूची गाणी ऐकणाऱ्या एका चाहत्याची सिनेमात कथा होती, आणि योगायोग म्हणजे ते गाणं प्रत्यक्षातही खुद्द कुमार सानूच्याच आवाजात साकारलं गेलं. त्यामुळे एका अत्यंत साध्या पद्धतीने रेकॉर्ड झालेल्या गाण्याला नंतर भव्य संगीताची जोड मिळाली आणि गाणं सुपरहिट झालं. बोटांच्या तालावर गायलेलं ते गाणं आता रसिकांच्या मनावर राज्य करतं.

गाण्याचे बोल

ख़ुदा से ज़्यादा तुम पे ऐतबार करते हैं

गुनाह है जान के भी बार-बार करते हैं

बार-बार करते हैं

तू मेरी है प्रेम की भाषा

लिखता हूं तुझे रोज़ ज़रा सा

तू मेरी है प्रेम की भाषा

लिखता हूं तुझे रोज़ ज़रा सा

कोरे-कोरे कागज़, जिन पे बेकास…

कोरे-कोरे कागज़

जिन पे बेकास लिखता हूं ये खुलासा

तुमसे मिले, दिल में उठा दर्द करार

जीने लगा वही जिसने इश्क़ ने मारा

तुमसे मिले, दिल में उठा दर्द करार

जीने लगा वही जिसने इश्क़ ने मारा

Follow Us
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?