AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samreen Kaur : आम्ही गेल्या चार वर्षांपासून…आशीष चंचलानीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अर्शदीप सिंहच्या गर्लफ्रेंडनं सोडलं मौन, ट्रोलर्सना सुनावलं

Samreen Kaur : अर्शदीप सिंहची गर्लफ्रेंड समीरन कौरचं नाव युट्युबर आशीष चंचलानीसोबत जोडलं गेलं. यावर आता समीरननं प्रतिक्रिया दिली आहे.

Samreen Kaur : आम्ही गेल्या चार वर्षांपासून...आशीष चंचलानीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अर्शदीप सिंहच्या गर्लफ्रेंडनं सोडलं मौन, ट्रोलर्सना सुनावलं
| Updated on: Nov 13, 2026 | 4:15 PM
Share

सोशल मीडियावर सध्या भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंह आणि अभिनेत्री समरीन कौर यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी या दोघांनी आपल्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अर्शदीपने समरीनला डायमंडची अंगठी देत प्रपोज केलं. या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच समरीनचं नाव पुन्हा एकदा प्रसिद्ध युट्यूबर आशीष चंचलानीसोबत जोडलं जाऊ लागलं आहे. या चर्चांमुळे समरीन चांगलीच संतापली असून तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही, तर तिचे फोटो आणि नाव वापरून व्ह्यूज मिळवणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

आशीष चंचलानीसोबतच्या अफवांवर समरीनने सोडलं मौन

समरीन कौर आणि आशीष चंचलानीचं नाव यापूर्वीही अनेकदा एकत्र जोडलं गेलं होतं. दोघेही सोशल मीडियावर एकत्र दिसत असल्यानं त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आशीषने काही पॉडकास्टमध्ये आपल्या पूर्वीच्या नात्याबद्दल आणि त्या नात्यातील कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं होतं. आता समरीनच्या अर्शदीपसोबतच्या साखरपुड्यानंतर पुन्हा एकदा या जुन्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक सोशल मीडिया पेजेसवर समरीन आणि आशीषचे जुने फोटो, व्हिडीओ आणि एडिटेड रील्स शेअर केल्या जात आहेत. यावर समरीननं इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली.

‘आम्ही चार वर्षांपासून बोललेलो नाही’

समरीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, इंटरनेट हे खरंच एक विचित्र ठिकाण आहे. कधी ते मजेशीर वाटतं, तर कधी निराशा देतं. सकाळी उठल्यानंतर तिला एका युट्यूबरसोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ वापरून तयार केलेल्या रील्स दिसल्या. या युट्यूबरसोबत तिनं चार वर्षांपूर्वी काम केलं होतं. याबाबत स्पष्ट करताना समरीन म्हणाली, ‘आम्ही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांशी बोललेलो नाही. एवढंच नाही, तर त्यानंतर आम्ही एकत्र कोणताही कंटेंट तयार केलेला नाही. त्यामुळे व्ह्यूज मिळवण्यासाठी चार वर्षांपूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा वापरून खोट्या गोष्टी पसरवणं बंद करा.’

पॉडकास्टमध्ये ज्या मुलीचा उल्लेख करण्यात आला आहे, ती मुलगी मी नाही. याबाबत मी अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही वारंवार माझं नाव या चर्चांमध्ये ओढलं जात आहे. आशीषसोबत माझा कोणताही संबंध नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

समरीननं पुढे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सना खडेबोल सुनावले. कोणाबद्दलही चुकीची प्रतिमा तयार करणं आणि संदर्भ सोडून जुने व्हिडीओ प्रसारित करणं हा संबंधित व्यक्तीचा अपमान असल्याचं तिनं म्हटलं. तसंच, केवळ क्लिकबेट आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तिचं नाव किंवा फोटो वापरणाऱ्या क्रिएटर्सविरोधात तिची टीम कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही तिनं दिला. प्रत्येक गोष्ट केवळ क्लिक आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी नसते. अशा पोस्टचा परिणाम संबंधित व्यक्तीच्या कुटुंबावर आणि प्रतिष्ठेवरही होऊ शकतो, याचं भान सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी ठेवायला हवं, असं समरीननं स्पष्ट केलं.

Follow Us
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?