dhurandhar 2 : धुरंधर 2 पाहिल्यानंतर कथा, प्रोपेगेंडा या पलीकडे जाऊन ‘रॉ’ बद्दल निर्माण झालेले काही प्रश्न

dhurandhar 2 : सध्या सगळीकडे 'धुरंधर द रिवेंज' सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा थिएटर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. हे खरच असं घडलं असेल का? मलाही असेच चित्रपटापलीकडचे काही प्रश्न पडले. त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. कारण या चित्रपटात स्पेशल ऑपरेशन दाखवलं आहे.

dhurandhar 2 : धुरंधर 2 पाहिल्यानंतर कथा, प्रोपेगेंडा या पलीकडे जाऊन रॉ बद्दल निर्माण झालेले काही प्रश्न
dhurandhar 2
| Updated on: Mar 31, 2026 | 4:27 PM

दोन दिवसांपूर्वीच ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमा पाहिला. डिसेंबर महिन्यात ‘धुरंधर’ चा पाहिला भाग पाहिल्यानंतर पार्ट 2 बद्दल प्रचंड उत्सुक्ता होती. ‘धुरंधर 2’ सिनेमा तुम्हाला कुठेच निराश करत नाही. जसकीरतच्या अगदी पहिल्या सीनपासून हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो, तो शेवटपर्यंत. हे दिग्दर्शकाचं कौशल्य, यश म्हणावं लागेल. पहिल्या भागात गँगस्टर रेहमान डकैतचा मृत्यू झाल्यानंतर ल्यारीचा पुढचा बादशाह कोण होणार? हमजा अली मझारी बनलेला जसकीरत मूळचा कोण आहे? त्याच्या कुटुंबासोबत काय घडलेलं? तो भारताचा गुप्तहेर कसा बनला? मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा बदला कसा घेणार? हे असे अनेक प्रश्न धुरंधरचा पहिला भाग संपल्यानंतर मनात होते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ‘धुरंधर द रिवेंज’ मध्ये दडलेली आहेत. धुरंधर सिनेमाच्या दोन्ही भागांची मेकिंग जबरदस्त आहे या बद्दल अजिबात शंका नाही. धुरंधर पाहिल्यानंतर बऱ्याच काळाने स्वत:ची कथा, उत्तम आशय, विषय, मांडणी असलेला हिंदी सिनेमा पहायला मिळाला, अशी थिएटर बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात भावना असते. धुरंधर चित्रपटाचा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us