AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : ‘केतनला संपवण्यासाठी एवढी मेहनत का, फक्त एकदा…’, पुणे हत्याकांडावर बड्या सेलिब्रिटीचं लक्षवेधी वक्तव्य

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात रोज नावीन अपडेट समोर येत असातना, एका बड्या सेलिब्रिटीने लक्षवेधी वक्तव्य केले आहे... केतनला संपवण्यासाठी एवढी मेहनत का घेतली. असा प्रश्न देखील येवेळी सेलिब्रिटीने उपस्थित केला... सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

Ketan Agarwal Murder Case : 'केतनला संपवण्यासाठी एवढी मेहनत का, फक्त एकदा...', पुणे हत्याकांडावर बड्या सेलिब्रिटीचं लक्षवेधी वक्तव्य
| Updated on: Jun 30, 2026 | 12:43 PM
Share

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील श्रीमंत उद्योजक केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. घडलेल्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिक (Bollywood Singer Amaal Mallik) याने देखील एक्सवर एक पोस्ट करत प्रकारणावर संताप व्यक्त केला आहे. सध्या अमाल याची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

केतन हत्याकांडानंतर अमाल पोस्ट करत म्हणाला, ‘केतन याला संपवण्यासाठी एवढी मेहतन घ्यायची काय गरज होती. फक्त एक नाही म्हणाली असती तरी पुढे काही झालं असतं… दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे, असं तिने सांगायला हवं होतं… सांगून देखील त्याने ऐकलं नसतं, तर कुटुंबियांना सांगितलं असतं. आजच्या जगात महिलांसाठी अनेक कायदे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सुशिक्षित आणि कमावणाऱ्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध आणि तिच्या इच्छेविरुद्ध जाण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही…’

‘कोणाचं तरी मुलं हिरावल्यानंतर आपण कसं आनंदी राहू शकतो… हत्येचा विचार करण्याची दोघांची हिंमत तरी झाली कशी? एक जीव गेला… कुटुंब उद्ध्वस्त झाली. राक्षस…”, असं देखील अमाल मलिकनं म्हटलंय. आणखी एका पोस्टमध्ये अमाल म्हणाला, ‘गेल्या अनेक वर्षांपासून पुरुषांकडून महिलांवर अत्याचार झाले आहेत. महिलांनी खूप काही सहन केलं आहे, त्या सर्व महिलांची मी माफी मागतो. पुरुषप्रधान विचारधारेला विरोध करणाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. जे लोकं महिलांचा छळ करतात, त्यांना एक जनावराप्रमाणे वागवतात… अशा लोकांच्या विरोधात आवज उठवलाच पाहिजे. पण, प्रत्येक गोष्टीला ‘टॉक्सिक’ असं नाव दिल्यामुळेच आपण खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होतं. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी लग्न करणं देखील टॅक्सिक आहे… एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपवणं हे देखील तितकंच टॅक्सिक आहे…’

पुढे अमाल म्हणाला, ‘इन्स्टाग्रामवर दाखवण्यासाठी फक्त लग्न करायचं की, आनंदासाठी आणि प्रेमासाठी लग्न करायचं? लोणावळ्यात देखील सुंदर हनिमूनमध्ये तुम्ही आनंदी राहू शकता. त्यासाठी मालदिवलाच जाण्याची काहीही गरज नाही. या माणसासोबत जे झालं, ते नव्हतं व्हायला पाहिजे… तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तो आनंदी होता. केतन अग्रवाल खूप निर्मळ मनाचा आणि गोड वाटत होता… असं देखील अमाल याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती