AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : ‘सिया पॉइंट’ कुठे? केतन हत्याकांडानंतर लोहगडावरवर वाढली पर्यटकांची संख्या, याचे परिणाम काय होतील?

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर फक्त राज्यातच नाही तर, संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर लोहगडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे... तर याचे परिणाम गंभीर आहेत... असं स्थानिकांचं म्हणणं आहे...

Ketan Agarwal Murder Case : 'सिया पॉइंट' कुठे? केतन हत्याकांडानंतर लोहगडावरवर वाढली पर्यटकांची संख्या, याचे परिणाम काय होतील?
| Updated on: Jun 30, 2026 | 12:01 PM
Share

Ketan Agarwal Murder Case : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील लोहगड (Lohagad) हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याचा अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. पण आता केतन अग्रवाल हत्याकांडानंतर किल्ल्यावर पोहोचणार प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणजे ‘सिया पॉइंट’ कुठे आहे… जे अत्यंत दुर्दैवी आहे… केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी योजनेनुसार लोहगड किल्ल्यावर पोहोचले आणि 400 फूट खोल दरीमधेये केतनला ढकलून दिलं. अशात ज्या जागेवर ही घटना घडली, ती जागा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. जे अत्यंत धक्कादायक आहे.

ऐतिहासिक आणि स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असते. इतिहास प्रेमी, पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक किल्यावर येत असतात. पण आता लोहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी वाढली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, ज्या किल्ल्यावर मावळ्यांनी इतिहास घडवला, तेथे येणार पर्यटक आता ‘सिया पॉइंट’ कुठे आहे? असा प्रश्न विचारत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर 4 ते 5 हजार लोक येत. पावळ्यात पर्यटकांची गर्दी होते. पण केतन अग्रवाल या थरारक हत्याकांड़ानंतर पर्यटकांचा दृष्टिकोन बदलल्याचं चित्र आहे. पर्यटकांनी स्वतःच या जागेला ‘सिया पॉइंट’ असं नाव दिलं आहे… हा स्पॉट पाहण्यासाठी किल्ल्यावर जाणार्‍यांची संख्या अचानक 25 टक्क्यांनी वाढली आहे.

लोकांकडून व्यक्त केली नाराजी…

‘लोहगड विसापूर विकास मंचा’चे प्रमुख सचिन टेकावडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘अशा ऐतिहासिक आणि संस्कृतीक ठिकाणी अशी हत्येची घटना घडणं हे फ्क दुर्दैवी नाही तर, धक्कादयक देखील आहे. पण सोशल मीडियावर ज्याप्रकारे घटनेचे रिल्स आणि मिम्स व्हायरल होत आहेत, ते अधिक भयानक आहे…’ असं देखील ते म्हणाले.

केतन हत्या प्रकरणात नवीन अपडेट काय?

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चेतन चौधरीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. घटनेच्या दिवशी त्याने कोणते कपडे घातले होते, हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करत आहेत. पोलिसांनी त्याने वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. घटनेचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी पोलीस लवकरच चेतन चौधरीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्याची शक्यता आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश