AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: ‘मुंढेसाहेब जरा लक्ष द्या, त्या बायका मिसरी लावतात अन् गावभर…’ चिुमकल्याचा तुकाराम मुंढेसाठी खास व्हिडिओ

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर धडाधड कारवाई केली. आता पुन्हा एकदा एका लहानग्या चिमुकल्याने तुकाराम मुंढे यांना आपल्या गावात येण्याची विनंती केली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tukaram Mundhe: 'मुंढेसाहेब जरा लक्ष द्या, त्या बायका मिसरी लावतात अन् गावभर...' चिुमकल्याचा तुकाराम मुंढेसाठी खास व्हिडिओ
| Updated on: Aug 15, 2026 | 7:26 AM
Share

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर धडाधड कारवाई केली. दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनी आता धासतावल्या आहेत. तुकाराम मुंढे दरदिवसी भेसळयुक्त पदार्थांची भेसळ बाहेर काढताना दिसतायेत. मुंढेच्या या कामगिरीमुळे सामान्य जनता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तर अनेक जण स्वत:हून त्यांना त्यांच्या शहरात येऊन सुरु असलेल्या गैरप्रकारावर धाड टाकण्यासाठी आमंत्रण देत आहेत. आता पुन्हा एकदा एका लहानग्या चिमुकल्याने तुकाराम मुंढे यांना आपल्या गावात येण्याची विनंती केली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याच पार्श्वभूमीवर एका लहान मुलाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. त्याने मुंढेंना तोंडाला लावायची जी मशेरी असते ती बंद करण्याची विनंती केली आहे. तो म्हणतोय, “महिला तोंडामध्ये मशेरी भरतात आणि गावभर लोकांची मापं काढत फिरत असतात. ” हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. त्या लाहन मुलाचा बोलण्याचा अंदाज फारच मजेशीर असल्याने व्हिडिओ सोशलल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ namdev.patil.5015 या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. “तुकाराम मुंढे साहेब… त्या मिसरीकडे सुद्धा लक्ष द्या. अहो, बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा आणि मग सगळ्या गावाची मापं काढत बसतात,” या मजेशीर अंदाजात त्याने व्हिडिओ शूट केला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तंबाखू भाजून त्याची पावडर तयार केली जाते. नंतर या पावडरचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. या पावडरला गावाकडच्या भाषेत मशेरी किंवा मिसरी असे गावकरी म्हणतात. वर्षानुवर्षे गावकरी काही लोक किंवा वृद्ध मंडळी टूथपेस्टऐवजी मशेरीने दात घासतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांनी दात घासणं हे आरोग्यासाठी योग्य नाही. याचा विपरीत परिणाम शरीरावर पडतो.

या अवघ्या 30 सेकंदांच्या व्हिडीओवर आतापर्यंत 4 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. कोणी म्हणतंय, “मुंढे साहेब, या मुलाच्या तक्रारीकडे तातडीनं लक्ष द्याची गरज आहे.” तर कोणी म्हणतंय, “बाळा, उगाच नको ती तक्रार करू नकोस नाहीतर गावातील बायका लाटणं घेऊन तुझ्याच मागे लागतील.”

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....