AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe Fda : डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंनी फ्रुटी, कॅन्डी ज्यूस वाल्यांना दिला दणका, 11 तास सुरु होती रेड

Tukaram Mundhe Fda : एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू केलेलं हे धाडसत्र 14 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजता थांबलं. तब्बल 11 तास झाडझडती सुरु होती.

Tukaram Mundhe Fda : डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंनी फ्रुटी, कॅन्डी ज्यूस वाल्यांना दिला दणका, 11 तास सुरु होती रेड
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 14, 2026 | 3:36 PM
Share

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर, अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध जोरदार कारवाई सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग किती कणखरतेने आणि मजबुतीने काम करु शकतो हे तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे. बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सवर कारवाई करण्यात आली. तिथे व्हेज-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म वापरला जात होता. गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या ‘पार्ले अ‍ॅग्रो’ कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत मुदत संपलेल्या एक्सपायरी डेट ओलांडून गेलेली फ्रुटी, अ‍ॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू केलेलं हे धाडसत्र 14 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजता थांबलं. तब्बल 11 तास झाडझडती सुरु होती. बुधवारी एफडीएकडून विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले. त्याशिवाय मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज आउटलेटसचे परवानेही निलंबित करण्यात आले. ज्यूबिलंट फूडवर्क्स अंतर्गत हे आउटलेट्स सुरु होते.

डॉमिनोज आउटलेटवर कारवाई का?

FDA ने ‘पार्ले अ‍ॅग्रो’चं गोदाम सील केलं असून माल वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन वाहनही जप्त केली आहेत. एफडीएच्या पुढील आदेशापर्यंत या गोदामातून कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री, वाहतूक करता येणार नाहीय.बंदीअसेल. विलेपार्ले पश्चिमेला असलेल्या डॉमिनोज आउटलेटमध्ये पिण्याच्या पाण्याची खराब व्यवस्था होती, अन्न स्टोरेज व्यवस्था नीट नव्हती, पेस्ट कंट्रोल एकूणच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होती.त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला. तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडाका लावला आहे.  त्यांच्या या मोहिमेचं जनसामान्यांकडून स्वागत होत आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप