AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir : ठाकरे गटातील असंतोष पुन्हा दिसला – सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिरसाटांचं मोठं विधान

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, अहिर यांनी शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकनाथ शिंदे यांच्या या धक्कातंत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sachin Ahir : ठाकरे गटातील असंतोष पुन्हा दिसला - सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिरसाटांचं मोठं विधान
शिंदे गटा सचिन अहिर आल्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
| Updated on: Jun 30, 2026 | 12:54 PM
Share

6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदे सेनेत प्रवेश केला, त्यामुळे ठाकरे गटाला बसलेल्या धक्क्याचा जोर अजूनही कमी झालेला नसताना मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका बसला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिनअहिर हे फुटले. एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 8 दिवसांत ठाकरेंना हा मोठा धक्का दिला. विधान परिषदेचे आमदार असलेले सचिन अहिर हे ठाकरे गाटतून बाहेर पडले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांनी विधानपरिषद उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून उमेदवारीअर्ज भरला. एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून सर्वत्र याच ऑपरेशनची चर्चा सुरू आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.

आज उबाठामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा दिसला

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज दाखल करण्याची वेळ होती. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आम्ही सर्वजण उपस्थित होतो. आज कोणाचा फॉर्म भरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा उबाठाचं एक ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सचिन अहिर यांचा उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन अहिर मूळ शिवसैनिक, त्याने शिवसेनेतच प्रवेश केला आहे. म्हणून त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे यांनी केलं. आणि आज उबाठामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळला आहे. याला उबाठाचे नेते काय नाव देतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल असा टोला शिरसाट यांनी लगावला.

कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न, त्याचाच हा स्फोट

आम्ही ऑपरेशन करण्याच्या आणखीन मानसिकतेत नाही, हे जे येतात, त्या ठिकाणी त्यांची मानसिकता ढासळललेली आहे. पक्ष नेतृत्व काय करतोय, कार्यकर्त्यांना तिथे काय सन्मान मिळतोय हे त्यांनी पाहिलं आहे. सचिन अहिर हे काही काल परवाचे कार्यकर्ता नाहीत . ते राज्यमंत्री राहिले आहेत, वरळी भागात त्यांचं एक वजन राहिलं आहे. आणि अशा कार्यकर्त्यांनाही दाबण्याचा जो काही प्रयत्न झाला होता, त्याचा हा स्फोट झाला आहे,अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सचिन अहिर यांच्या बाहेर पडण्याचं कारण स्पष्ट केलं.

आता  सचिन अहिरांला या पक्षात येण्यासाठी काय ऑफर्स दिल्या, त्याच्यावर (ठाकरे गटाकडून) काय टीका होते, सचिन अहिर विकला गेला असं म्हणतील का, हे सगळं आता आम्हाला पहायचं आहे, असंही शिरसाट म्हणाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा