मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्यातील राजकारणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

सचिन अहिर यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने अर्ज दाखल केल्याने या हालचालीची कोणतीही पूर्वकल्पना माध्यमांना लागली नव्हती. अर्ज दाखल करताना महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित असल्याने या घडामोडीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय असेल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यावर काय प्रतिक्रिया येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील इतर नेते या राजकीय घडामोडीवर काय भाष्य करतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Jun 30, 2026 12:14 PM
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर