बॉलिवूडमध्ये शाहरुख – सलमान यांची जागा कोण घेणार ? टायगर – पठाण यांनीच दिलं प्रश्नाचं उत्तर

शाहरुख - सलमान यांच्यानंतर बॉलिवूडवर कोण करणार राज्य? ३० वर्ष बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर कोण घेणार 'टायगर - पठाण' यांची जागा? शाहरुख - सलमान एका व्हिडीओतून दिलं प्रश्नाचं उत्तर

बॉलिवूडमध्ये शाहरुख - सलमान यांची जागा कोण घेणार ?  टायगर - पठाण यांनीच दिलं प्रश्नाचं उत्तर
बॉलिवूडमध्ये शाहरुख - सलमान यांची जागा कोण घेणार ? टायगर - पठाण यांनीच दिलं प्रश्नाचं उत्तर
| Updated on: Jan 31, 2023 | 12:58 PM

Shah Rukh Salman Khan Video : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान यांना एकत्र पाहण्यासाठी चाहतचे आतुर होते. अखेर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून दोघे एकत्र आले आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली. आता बॉलिवूडच्या दोन्ही खान यांची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात मोठी गर्दी करत आहेत. सध्या शाहरुख आणि सलमान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे स्वतःच्या सिक्वेंसबद्दल चर्चा करत आहेत. व्हिडीओमध्ये दोघे चर्चा करताना दिसत आहेत, की शाहरुख आणि सलमान यांची जागा कोण घेणार? यावर दोघांनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये शाहरुख आणि सलमान रॉ (RAW) सोडण्याबद्दल बोलत आहेत. दोघांचा इशाऱ्यांमध्ये संवाद सुरु आहे. त्यांच्या संवादाचा इशारा आहे की, बॉलिवूडमध्ये आपली जागा कोण घेणार? या प्रश्नाचं उत्तर दोघे एकमेकांना इशाऱ्यात देतात. तेव्हा दोघे देखील एकमेकांच्या उत्तराशी सहमत होत नाहीत. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

पठाण सिनेमातील जबरदस्त फाईट सीननंतर शाहरुख आणि सलमान माल गाडीच्या डब्ब्यावर बसतात. तेव्हा शाहरुख सलमान याला म्हणतो, ‘तीस वर्ष झाली आता हे सगळं सोडायला हवं…’ यावर सलमान म्हणतो, ‘पण आपली जागा कोण घेणार…’ यावर दोघांचं इशाऱ्यानं बोलणं होतं. अखेर शाहरुख म्हणतो, ‘आपल्यालाच करावं लागेल… देशाचा प्रश्न आहे… मुलांवर सोडू शकत नाही…’ सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, शाहरुख आणि सलमान यांना बॉलिवूडमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. पण तरी देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या आणि चाहत्यांच्या मनात दोघांबद्दल असलेलं प्रेम कमी झालेलं नाही. दोघांनी बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तब्बल ३० वर्ष बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर शाहरुख आणि सलमान यांची जागा कोण घेईल? हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

पठाण सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

सोमवारी सिनेमाने फक्त २५ कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा केला. तर आतापर्यंत सिनेमाने भारतात जवळपास ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अशी माहिती ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. जगभरात सिनेमाने ६०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाचीच चर्चा आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कमी कालावधीमध्ये जास्त कमाई करणार पठाण एकमेव सिनेमा ठरला आहे. सहा दिवसांमध्ये पठाण सिनेमाने अनेक विक्रम रचले आहे.