Welcome 3 | ‘वेलकम 3’ च्या टीझरनंतर सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर, उदय आणि मजनूची लोकांना आठवण, थेट म्हणाले, आता

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या वाढदिवसानिमित्त आज मोठी घोषणा करण्यात आलीये. वेलकम 3 चित्रपटाचे नुकताच टीझर रिलीज केले. या टीझरमध्ये मोठी स्टार कास्ट बघायला मिळत आहे. वेलकम 3 चित्रपटाचे टीझरचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होतोय.

Welcome 3 | वेलकम 3 च्या टीझरनंतर सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर, उदय आणि मजनूची लोकांना आठवण, थेट म्हणाले, आता
| Updated on: Sep 09, 2023 | 7:59 PM

मुंबई : अक्षय कुमार याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत मोठी घोषणा ही केलीये. अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून फार काही धमाका करताना दिसत नाहीयेत. अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. आता अक्षय कुमार याने मोठा धमाका करण्याचा निर्णय घेतलाय. आजच अक्षय कुमार याने वेलकम 3 (Welcome 3) चित्रपटाचा टीझर रिलीज केला. या टीझरसोबतच अक्षय कुमार याने वेलकम 3 चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर केलीये. सध्या वेलकम 3 चा टीझर व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

वेलकम 3 चित्रपटामध्ये मोठी स्टार कास्ट बघायला मिळत आहे. अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस आणि दिशा पटानी हे या टीझर व्हिडीओमध्ये दिसत आहेत. वेलकम 3 चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आल्याचे बघायला मिळत आहे.

इतकेच नाही तर वेलकम 3 चा टीझर पाहून लोकांना थेट उदय-मजनू यांच्याच जोडीची आठवण झालीये. उदय-मजनू म्हणजेच अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांची. अक्षय कुमार याच्या चाहत्यांना हा टीझर व्हिडीओ आवडला आहे. दुसरीकडे मात्र, या टीझर व्हिडीओची खिल्ली उडवली जात असल्याचे देखील बघायला मिळत आहे.

अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 चित्रपटात दिसणार नसल्याचे सांगितले जात होते. इतकेच नाही तर हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आपल्याला आवडली नसल्याने आपण चित्रपटाला नकार दिल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगताना अक्षय कुमार हा दिसला. मात्र, त्यानंतर अचानकपणेच अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला होकार दिला.

मुळात म्हणजे अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला देखील खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. ओएमजी 2 हा चित्रपट देखील अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ओएमजी 2 या चित्रपटाने 150 कोटींचे आतापर्यंत बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे केले आहे.