Salman Khan सोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील मिटले वाद? दोघांचा अनेक वर्षांनंतर खास व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा

Salman Khan सोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
| Updated on: Apr 08, 2023 | 11:30 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या जोडीला पसंत करणारे चाहते, सोशल मीडियाटच्या माध्यमातून चाहते अनेक प्रश्न देखील उपस्थित करत आहेत. नक्की असं काय झालं ज्यामुळे दोघांनी टोकाचा निर्णय घेतला? असे अनेक प्रश्न सध्या जोर धरत आहेत. बॉलिवूडमधील सर्वात रॉयल कपल म्हणून दोघांची ओळख आहे.

अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) यांच्या नात्याची चर्चांना सध्या उधाण आलं आहे. दोघांच्या नात्यावर नेटकरी म्हणाले, ‘बॉलिवूडचं हे कपल विभक्त व्हावं असं मला वाटत नाही…’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘या निव्वळ अफवा आहेत’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघे विभक्त होतील, यावर माझा विश्वास नाही…’ दरम्यान, अद्याप काय खरं आणि काय खोटं समोर आलेलं नाही. पण चर्चा मात्र तुफान रंगत आहेत.

का रंगत आहेत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा?

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या देखील उपस्थित होत्या. पण दोघींसोबत अभिषेक नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं. दोघींच्या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या.

दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान देखील उपस्थित होता. कार्यक्रमातील एका व्हिडीओने मात्र चाहत्यांना थक्क केलं. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनेक वर्षांनंतर सलमान आणि ऐश्वर्या एकत्र दिसले.

 

 

सलमान खान आणि ऐश्वर्या रायला असं एकत्र पाहून चाहते खुश त्यांचा हा आनंद काही क्षणासाठी होता. कारण दोघांचा व्हिडीओ एडिट केले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण व्हिडीओनंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मुंबईमध्ये ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. ज्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक वर्ष चर्चेत राहिले.