Aishwarya Rai: वेगळे राहिले, घटस्फोटाच्या चर्चा झाल्या; ऐश्वर्या अभिषेकचा पाहण्यासारखा Video, सर्वांसमोरच…
Aishwarya Rai: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने सर्वांसमोर अभिषेकला मिठी मारली आहे. या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडचे सर्वाधिक चर्चेतले जोडपे आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. दोघांमध्ये दुरावा आल्याच्या, घटस्फोट घेण्याच्या आणि अगदी ग्रे डिवोर्स झाल्याच्याही चर्चा जोर धरून होत्या. ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांसोबत एकाच घरातही राहत नसल्याचे बोलले जात होते. या सर्व अफवांना अभिषेकने अनेक मुलाखतींमध्ये स्पष्टपणे खोडून काढले होते. त्यानंतर दोघे काही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसलेही. कितीही चर्चा झाल्या तरी त्यांच्यातील प्रेम कायम आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
दिवाळीच्या एका पार्टीमध्ये दोघेही सहभागी झाले होते. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि त्यांचे प्रेम पुन्हा कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दिवाळी म्हटलं की बॉलिवूडमध्ये पार्ट्या, खास लूक आणि सेलिब्रेशनची चर्चा सुरू होते. यंदाही चित्रपटसृष्टीत पार्ट्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मलहोत्राने आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक लोकप्रिय कलाकार हजर होते. मात्र या संध्याकाळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या जोडीने.
ऐश्वर्याने मारली मिठी
बऱ्याच दिवसांनंतर दोघे एकत्र, आनंदी आणि एकमेकांसोबत दिसले. मनीष मलहोत्राच्या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र एण्ट्री मारली. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांचा हात धरला होता. कॅमेऱ्यासमोर फोटो काढतानाही त्यांच्यातील सुंदर बॉन्डिंग स्पष्ट दिसत होते. एकदा ऐश्वर्या अभिषेकच्या जवळ उभी राहून पोझ देताना दिसली. तर दुसऱ्यावेळी तिने अभिषेकला थेट मिठी मारली. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांचे लक्ष वेधले.
ऐश्वर्याचा ग्लॅमरस लूक
या खास संध्याकाळीसाठी ऐश्वर्याने लाल रंगाची आकर्षक साडी नेसली होती. लाल लिपस्टिक, पारंपरिक दागिने आणि तिचा नेहमीचा मोहक अंदाज यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. दुसरीकडे अभिषेकने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्याचा क्लासी लूक आणि ऐश्वर्यासोबतची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.