Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या जागी आलिया भट्ट! चाहत्यांना राग अनावर, नेमकं काय घडलं?

Aishwarya at Cannes: बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय ओळखली जाते. पण नुकतात एका ब्रँडने ऐश्वर्याच्या जागी आलिया भट्टचा फोटो वापरला आहे. ते पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या जागी आलिया भट्ट! चाहत्यांना राग अनावर, नेमकं काय घडलं?
Aishwarya Rai
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 13, 2026 | 3:21 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत आजही अग्रस्थानी आहे, यात शंका नाही. केवळ सौंदर्यामुळेच नाही, तर ऐश्वर्याचे व्यक्तिमत्वच (Aura) चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेसे आहे. दरवर्षी फ्रान्समधील कान्स शहरात होणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ती ‘लॉरियाल पॅरिस’ या ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हजेरी लावते. केवळ भारतीय चाहतेच नाही, तर संपूर्ण जगाचे डोळे तिच्याकडे लागलेले असतात. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली नाही.

12 मे पासून कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून हा सोहळा 23 मे पर्यंत चालणार आहे. मात्र, यावेळेस रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय दिसली नाही. इतकेच नाही तर लॉरियाल पॅरिसच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरही कान्ससाठी ऐश्वर्याचे कोणतेही शूट पाहायला मिळाले नाही. जेव्हा चाहत्यांनी ब्रँडला याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ब्रँडने काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

ब्रँडवर लोकांचा संताप

लॉरियलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर यावर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ब्रँड एम्बेसेडर्सचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया भट्टचा चेहरा दिसत होता आणि आलियानेही तिचे सुंदर फोटो शेअर केले होते. दरम्यान, ऐश्वर्याचा फोटो नसल्याचे पाहून चाहते संतापले आणि त्यांनी ब्रँडला विचारले की ‘ऐश्वर्या कुठे आहे?’ एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ब्रँडने म्हटले की, “वर्षानुवर्षे, प्रत्येक कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याने कधीच हजेरी चुकवलेली नाही.”

२००२ मध्ये पहिल्यांदा घेतला होता सहभाग

चाहत्यांना ना ब्रँडचे हे उत्तर आवडले, ना ऐश्वर्याला न बोलावण्याचा निर्णय. ऐश्वर्या रायने २००२ मध्ये पहिल्यांदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सुपरस्टार शाहरुख खान यांच्यासोबत कान्समध्ये एन्ट्री केली होती. त्यांच्या ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी हे तिन्ही स्टार्स तिथे पोहोचले होते. २००२ पासून ऐश्वर्या राय दरवर्षी कान्सची शान वाढवत रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवत असे. मात्र, यावर्षी ती कान्स सोहळ्यापासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. पण कान्स फिल्म फेस्टीवल हे २३ तारखेपर्यंत असल्यामुळे येत्या काही दिवसात ऐश्वर्या हजेरी लावते का? हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

Follow Us