Aishwarya Rai : ‘हॅण्डसम विथ ब्रेन’ का नाही? या प्रश्नावर ऐश्वर्याने दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही व्हाल हैराण

अभिषेक व ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र त्यापूर्वी ते दोघेही चांगले मित्र होते. उमराव जान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले. या दोघांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे

Aishwarya Rai : हॅण्डसम विथ ब्रेन का नाही? या प्रश्नावर ऐश्वर्याने दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही व्हाल हैराण
Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2022 | 10:08 PM

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)आपल्या सौंदर्यासोबतच तिच्या हजरजबाबीपणासाठी ओळखली जाते. बऱ्याचदा  मुलाखत व फॅशन शो दरम्यान तिचा हजरजबाबीपणा दिसून येत आहेत. ऐश्वर्या रॉयचा एका जूना व्हिडीओ सोशल मीडियावर(Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये(video) ऐश्वर्याचा चाहता तिला प्रश्न विचारला की ‘ब्युटी विथ ब्रेन’ असे म्हटले जाते मात्र ‘हॅण्डसम विथ ब्रेन ‘असे का म्हटले जात नाही. यावर तिने अत्यंत चपलखपणे उत्तर दिले आहे. जे एकून सर्वांनीच टाळ्या वाजवल्या.

ही घटना 2015  सालची ‘द कपिल शर्मा शो’ मधील आहे. यावेळी ऐश्वर्या तिच्या चित्रपट जज्बाच्या प्रमोशनसाठी आली होती. ऐश्वर्याने त्यावेळी त्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की तुम्ही अभिषेक बच्चन यांचे नाव ऐकले आहे का? तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तसेच तिच्या हजरजबाबी पणाचे कौतुकही करण्यात आले होते.

अभिषेक व ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र त्यापूर्वी ते दोघेही चांगले मित्र होते. उमराव जान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले. या दोघांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये सरकार राज , धूम 2, ढाई अक्षर प्रेम के, गुरु, रावण यासारख्या चित्रपटात दोघे एकत्र दिसून आले होते .

पुन्हा एकदा ऐश्वर्या चित्रपटामध्ये सक्रिय झालेली दिसून येणार आहे. प्रसिद्ध दिगदर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नीयिन सेलवन चित्रपटात दिसून येणार आहे. येत्या 30 सप्टेंबरला हा चित्रपट रीलिज होणार आहे. याबरोबरच अभिषेक ओथ सेरुप्पू साईज 7 च्या हिंदी रिमेकमध्ये दिसून येणार आहे.