काजोल अन् अजय देवगणच्या आलिशान बंगल्याचं नावं शिवभक्तांच्या मनाला भावणारं; फोटो होत आहेत व्हायरलं

अजय देवगण आणि काजोल यांच्या आलिशान बंगल्याची नेहमीच चर्चा होताना दिसते. मुख्य म्हणजे त्याच्या बंगल्याचे नाव हे शिवभक्तांच्या मनात भरणारे आहे. तसेच त्याच्या घरातील फोटोही व्हायरल होताना दिसत आहे.

काजोल अन् अजय देवगणच्या आलिशान बंगल्याचं नावं शिवभक्तांच्या मनाला भावणारं; फोटो होत आहेत व्हायरलं
Ajay Devgn
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 07, 2025 | 3:49 PM

बॉलिवूड सेलिब्रिटींचे चित्रपट, त्यांचे खासगी आयुष्य याबद्दल तर नेहमी चर्चा होतच असते पण यासोबतच जास्त चर्चा होते ती त्यांच्या आलिशान घराबद्दल.सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी देखील त्यांच्या घरासाठी तेवढेच भावनिक असतात. कष्टाच्या कमाईने त्यांच्या स्वप्नातील वास्तू त्यांनी उभारलेली असते किंवा विकत घेतलेली असते. त्यामुळे ते सर्वप्रकारे आपल्या घराला सजवण्यासाठी, सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यात शाहरुखच्या मन्नत पासून ते सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटपर्यंत, तसेच अमिताभ यांच्या जलसा बंगला असो किंवा मग राजेश खन्ना यांचा आशिर्वाद बंगला. या सर्वांच्य आलिशान वास्तूंची चर्चा होतच असते. पण यात एका सेलिब्रिटी जोडीच्या बंगल्याच्या नावाची चर्चा होताना नेहमी दिसते ती जोडी म्हणजे काजोल आणि अजय देवगन.

बंगल्याचे नाव हे सर्व शिवभक्तांच्या मनात भरणारे 

अजय देवगणची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि स्टायलिश अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि अजूनही तो मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. अजयने 2 एप्रिल रोजी त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. अजय देवगण भगवान शिवाचा भक्त प्रचंड मोठा भक्त आहे. म्हणूनच त्याने त्याच्या बंगल्याचे नावही अगदी अध्यात्मिकपद्धतीचे ठेवले आहे. त्याच्या बंगल्याचे नाव हे सर्व शिवभक्तांच्या मनात भरणारे आहे. त्याने त्याच्या बंगल्याचे नाव हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या नावावरून ठेवले आहे.

अजय देवगणचा मुंबईतील जुहू परिसरातील भव्य बंगला

अजय देवगणचा मुंबईतील जुहू परिसरात एक भव्य बंगला आहे, ज्याला त्याने ‘शिवशक्ती’ असे नाव दिले आहे. या घराची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या आलिशान बंगल्याच्या प्रवेशद्वाराला अतिशय शाही लूक देण्यात आला आहे. त्यांच्या लार्जर-दॅन-लाइफ घराचे मुख्य आकर्षण म्हणजे क्रीम आणि पांढर्‍या रंगाच्या भिंती,भव्य असा लाकडी जिना, लाकडी अॅक्सेंट, प्रशस्त बाल्कनी, घरातील काही भितींना दिलेला दगडी लूकचा टच.

Ajay Devgn home

घरात सुंदर इंटेरियर केलेलं आहे

तसेच घरात एक लहान पण स्टायलिश होम थिएटर देखील आहे, जिथे संपूर्ण कुटुंब बसून क्रिकेटचे सामने किंवा चित्रपट पाहतात. घरातील वातावरण खूप आरामदायी आणि कुटुंबासाठी अनुकूल आहे. अजयच्या या घरात एक मोठी बाग देखील आहे, जिथे बहुतेकदा पार्ट्या आणि सगळे वेळ घालवू शकतात. मुलांसाठी एक खुली खेळण्याची जागा देखील आहे.संपूर्ण घरात लाकडाचे सुंदर इंटेरियर केलेलं आहे. जे एक नैसर्गिक आणि उबदार अनुभव देते. घरातील प्रत्येक खोली आणि प्रत्येक कोपरा हा वेगळ्या थीमने सजवलेला आहे. अनेकदा काजोल घरात काढलेले तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान शिवशक्ती बंगला हे फक्त एक घर नाही तर अजय आणि काजोलच्या कठोर परिश्रमाची आणि यशाची गोष्ट आहे.

 

&