
Chhaava Fame Akshay Khanna: दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेता अक्षय कुमार पुन्हा चर्चेत आला. ‘छावा’ सिनेमानंतर अभिनेत्याने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता अक्षय खन्ना बॉलिवूड नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात स्वतःच्या अभिनयाच्या जादूने चाहत्यांना चकित करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता प्रशांत वर्मा सिनेमॅटिक यूनिव्हर्सचा पहिला महिला सुपरहिरो सिनेमा ‘महाकाली’ द्वारे तेलगू पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमात अक्षयला विशेष भूमिका मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
अक्षय खन्ना ‘महाकाली’ सिनेमात काम करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सिनेमाच्या टीमच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली की, सिनेमात अक्षय एक विशेष भूमिका साकारत आहे. मात्र, तो मोठा खलनायक आहे की हिरो आहे? हे निश्चित झालेले नाही.
सिनेमाबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली आहे. पण सिनेमाबद्दल चर्चांनी तुफान जोर धरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाकाली अद्याप प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे.सिनेमाचे निर्माते प्रशांत वर्मा आणि दिग्दर्शिका पूजा अपर्णा कोल्लुरू कलाकार आणि इतर गोष्टींना अंतिम रूप देण्यासाठी अधिक मेहतन घेत आहेत.’
अक्षय खन्ना यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘महाकाली’ सिनेमानंतर ‘अधीरा’ सिनेमात अभिनेता दिसणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्याचं भगवान इंद्रावर आधारित एक पात्र असेल. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेत अक्षय खन्ना याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. सिनेमात त्याने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वत्र कौतुक देखील झालं. पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबच्या मागे अक्षय खन्ना आहे… हे देखील अनेकांना कळलं नव्हतं.
रिपोर्टनुसार, सिनेमासाठी औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्ना याला 2 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. अभिनेत्याला मिळालेलं मानधन फार कमी आहे, शिवाय त्याचं स्क्रिन टाईम देखील कमी आहे… असं देखील म्हटलं जात आहे.