85 वर्षीय अभिनेत्याचं 32 वर्षीय अभिनेत्रीशी पॅचअप? वयाच्या 83 वर्षी बनले होते चौथ्यांदा पिता

85 वर्षीय अभिनेत्याचं 32 वर्षीय अभिनेत्रीवर प्रेम जडलं आणि त्यांना एक मुलगासुद्धा आहे, असं म्हटल्यावर कदाचित तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु असं खरंच घडलं आहे. 85 वर्षीय हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हॉलिवूड स्टार अल पचिनो आहे.

85 वर्षीय अभिनेत्याचं 32 वर्षीय अभिनेत्रीशी पॅचअप? वयाच्या 83 वर्षी बनले होते चौथ्यांदा पिता
अल पचिनो आणि अल्फल्लाह
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2026 | 9:55 AM

प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर, कोणत्याही वयात एखादी व्यक्ती प्रेमात पडू शकते. हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड.. असे काही स्टार प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीत आहेत, ज्यांनी प्रेमात वयाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सध्या असाच एक कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 85 वर्षांचा हा अभिनेता 32 वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. वयातील इतक्या मोठ्या फरकामुळे चर्चेत आलेली जोडी आहे प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता अल पचिनो आणि नूर अल्फल्लाह यांची. हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. परंतु मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा एकदा या दोघांना लॉस एंजिलिसमध्ये एकत्र पाहिल्यानंतर त्यांचं पॅचअप झाल्याचं म्हटलं जात आहे.

अल पचिनो आणि नूर अल्फल्लाह हे नुकतेच लॉस एंजिलिसमध्ये एकत्र डिनर डेटवर दिसले. ‘पेज सिक्स’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, या दोघांना सॅन व्हिसेंट बंगल्याच्या बाहेर एकत्र पाहिलं गेलं. याठिकाणी ते जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच भेटले होते. ब्रेकअपनंतर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. परंतु या भेटीबद्दल दोघांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

अल पचिनो आणि नूर

अल पचिनो आणि नूर यांना एक मुलगासुद्धा आहे. 2023 मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. त्यांच्या मुलाचं नाव रोमन पचिनो असं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी अल पचिनो चौथ्यांदा वडील झाले होते. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. इतकंच नव्हे तर जेव्हा नूरने मुलाला जन्म दिला, तेव्हा अल पचिनो यांनी त्या मुलाची डीएनए चाचणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये त्यांनी त्याच्या मुलाच्या पूर्ण पालकत्वासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू केली होती. नंतर न्यायालयानेही त्यांना मुलाला भेटण्याचे अधिकार देण्याचा निर्णय दिला.

एका मुलाखतीत अल पचिनो यांनी स्वत:ला अविवाहित आणि सिंगल असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर नूर आणि मी चांगले मित्र आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता दोघं पुन्हा एकत्र आले आहेत.