Video | तैमूर अली खान याने ‘राहा’ हिच्याजवळ कोणालाच फिरकू दिले नाही, आलिया भट्ट ही करीना कपूरच्या भेटीला

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मात्र, रणबीरआणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीची एकही झलक अजून चाहत्यांना दाखवली नाहीये. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर कपूर हा राहा हिच्याबद्दल बोलताना दिसला होता.

Video | तैमूर अली खान याने राहा हिच्याजवळ कोणालाच फिरकू दिले नाही, आलिया भट्ट ही करीना कपूरच्या भेटीला
| Updated on: Jun 05, 2023 | 4:09 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. आलिया भट्ट हिने मुलीच्या नावाचा अर्थ आणि तिचे नाव सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जाहिर केले. मात्र, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी त्यांच्या मुलीची एकही झलक ही चाहत्यांना अजिबातच दाखवली नाहीये. काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट ही तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग ही रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्यासोबत काश्मीर येथे करत होती. विशेष म्हणजे आलिया ही मुलगी राहा हिला देखील शूटिंगला घेऊन गेली होती.

नुकताच आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला घेऊन करीना कपूर खान हिच्या घरी पोहचली होती. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच तैमूर अली खान हा राहा हिला भेटला आहे. विशेष म्हणजे राहा हिला भेटून तैमूर अली खान हा फार जास्त आनंदी झाल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार राहा हिच्याकडे पाहतच तैमूर हा राहिला. इतकेच नाही तर यावेळी राहा हिच्याजवळ तैमूर अली खान हा इतर कोणालाही येऊ देत नव्हता. इतकेच नाही तर राहा आणि मामी आलिया भट्ट यांना सोडण्यासाठी तैमूर हा खाली देखील आला होता. राहा आणि आलिया भट्ट यांना बाय बाय करताना देखील तैमूर अली खान हा दिसत आहे.

राहा हिला सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच तैमूर अली खान हा भेटला आहे. खास लूकमध्ये आलिया भट्ट ही करीना कपूर हिच्या घरी पोहचली होती. इतकेच नाही तर पापाराझी यांना पाहून मुलीच्या चेहऱ्यावर हात ठेवताना देखील आलिया भट्ट ही दिसत आहे. पापाराझी यांच्यापासून मुलगी राहा हिचा चेहरा लपवताना आलिया भट्ट ही दिसली आहे.

14 एप्रिलला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना विवाह केला. त्यानंतर 6 नोव्हेंबरला आलिया हिने गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया भट्ट ही डिलीवरीनंतर लगेचच व्यायाम करताना दिसली. आलिया भट्ट हिने योगा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अत्यंत अवघड योगा करताना आलिया भट्ट ही दिसत होती.