
Alia Bhatt – Ranbir Kapoor : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या आलिया – रणबीर त्यांच्या मुलगी राहा कपूरमुळे तुफान चर्चेत आहेत. कोणत्याही ठिकाणी दोघांना स्पॉट केल्यानंतर त्यांना सर्वप्रथम राहाबद्दल विचारणा करण्यात येते. ६ नोव्हेंबर २०२३ मध्ये आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. पण लेकीच्या जन्मनंतर आलिया – रणबीरने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. राहाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. पण आता आलिया-रणबीर यांनी लेकीचा चेहरा फोटोग्राफर्सना दाखवला आहे.
एका कर्यक्रमात रणबीरने त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या राहाचा क्यूट फोटो फोटोग्राफर्सना दाखवला आहे. आलिया – रणबीर आणि नीतू कपूर यांनी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये कपूर कुटुंबाने फोटोग्राफर्सना देखील आमंत्रण दिलं होतं. यावेळी रणबीरने फोटोग्राफर्सना लेकीचा फोटो दाखवला आणि त्यांच्यासोबत प्रचंड गप्पा देखील मारल्या.
रणबीरने राहाचा फोटो दाखवल्यानंतर नीतू कपूर यांनी फोटोग्राफर्सना फोटो पब्लिक न करण्याची विनंती केली. रणबीर आणि आलिया राहासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवणार आहेत. पण त्यांनी फोटोग्राफर्सना लेकीचा चेहरा दाखवला आहे. सध्या सर्वत्र आता कपूर कुटुंबातील नव्या लेकीची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, आलियाने इन्स्टाग्रामवर रुग्णालयातील सोनोग्राफीचा फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने प्रेग्नेंट असल्याचं चाहत्यांना सांगितलं त्यानंतर अभिनेत्रीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ६ नोव्हेंबरला आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
आलियाने लेकीच्या नावाची घोषणा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. पण अद्याप दोघांनी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखलेले नाही. सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चिमुकल्यांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी लेक वामिकाचा फोटो अद्याप दाखलेला नाही.