Alia Bhatt: यशाच्या शिखरावर असताना लग्न आणि आई होण्याचा निर्णय का घेतला? आलियाने सांगितलं कारण

करिअरच्या शिखरावर असताना लग्न का केलं, आई का झाली? अखेर आलियाने दिली सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं

Alia Bhatt: यशाच्या शिखरावर असताना लग्न आणि आई होण्याचा निर्णय का घेतला? आलियाने सांगितलं कारण
Alia Bhatt - Ranbir Kapoor च्या लेकीचा चेहरा समोर, पण फोटोग्राफर्सना महत्त्वाची विनंती....
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2023 | 1:07 PM

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटं दिली आहेत. करिअरच्या शिखरावर असताना गेल्या वर्षी आलियाने अभिनेता रणबीर कपूरशी लग्न केलं. 2022 याच वर्षात तिने मुलीला जन्म दिला. लग्न आणि आई होण्याच्या या निर्णयाबाबत आलिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. आपल्या कुठल्याही निर्णयांबद्दल पश्चात्ताप नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, “होय, करिअरच्या शिखरावर असताना मी लग्न आणि आई होण्याचा निर्णय घेतला. पण लग्न किंवा मातृत्वामुळे कामाच्या बाबतीत काही बदल होईल, असं कोण म्हणतं? जरी काही बदल होत असेल तरी मला काही फरक पडत नाही. मुलीला जन्म देण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला कधीच पश्चात्ताप होणार नाही, हे मला माहीत आहे. ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम निर्णय आहे.”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाची बहीण शाहीन भट्टसुद्धा या चर्चांवर व्यक्त झाली होती. “आलियासाठी मी भाष्य करणार नाही, कारण हा तिचा प्रवास आहे. ज्या गोष्टींना ती सामोरं गेली, तो संपूर्णपणे तिचा प्रवास आहे. तुम्ही कोणालाच समाधानी करू शकत नाही. नेहमीच एक किंवा दोन नकारात्मक कमेंट्स असतातच. सेलिब्रिटी असल्याने कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे आम्हाला नीट माहीत असतं”, असं शाहीन म्हणाली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील राहत्या घरीच या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या सात महिन्यांतच आलियाने मुलीला जन्म दिला.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये या दोघांनी पहिल्यांदा जेव्हा एकत्र सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावली, तेव्हा त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. जवळपास सहा-सात वर्षे डेट केल्यानंतर रणबीर-आलियाने या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली.